तुफान आ रहा है… भाजप नेत्यानं म्हटलं ते खरंच? मुंबईत आज अमित शाह यांचं आगमन, शिंदे-फडणवीसांची परीक्षा?

Amit Shah in Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्र अन् मुंबईत वाढलेल्या राजकीय हालचाली या शाह यांच्या दौऱ्यापूर्वीचीच अस्वस्थता असल्याचं मत भाजप नेत्याने व्यक्त केलंय.

तुफान आ रहा है... भाजप नेत्यानं म्हटलं ते खरंच? मुंबईत आज अमित शाह यांचं आगमन, शिंदे-फडणवीसांची परीक्षा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 10:42 AM

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षावरील सुनावणी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अन् एवढ्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपच्या गोटात प्रचंड हालचाली सुरु आहेत. काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय तर संजय राऊतांनीही मोठा दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याची भाजपची तयारी असल्याचं संजय राऊत म्हणालेत. अजित पवार यांच्या मध्यंतरीच्या नॉट रिचेबल प्रकरणावरून चर्चांना उधाण आलंय. राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल मोठं वक्तव्य केलंय. तुफान आ रहा है… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जिथे जातात, त्या ठिकाणी असंख्य राजकीय हालचाली सुरु होतात. शाह यांचं शनिवारी मुंबईत आगमन होतंय, त्यामुळेच ‘हे सर्व प्राणी घाबरलेत’ अशा आशयाचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त विरोधकांसाठीच नव्हे तर सत्ताधारी शिंदे-फडणवीसही अमित शहांसमोर आज मोठी परीक्षा देतील, असं म्हटलं जातंय.

अमित शहांचा कार्यक्रम काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शनिवारी आणि रविवारी मुंबई दौरा आहे. आज शनिवारी संध्याकाळी ते मुंबईत दाखल होतील. उद्या ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. रविवारी शहांच्या हस्ते अप्पासाहेबांना हा पुरस्कार दिला जाईल. तत्पुर्वी शनिवारी संध्याकाळी अमित शाह सह्याद्री अतिथि गृहात असतील. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करतील. भाजपच्या काही नेत्यांच्या भेटी घेतील.

हे मुद्दे महत्त्वाचे-

  • येत्या मे महिन्यात सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे.सत्ताधाऱ्यांमधील नेते मंडळी चिंतेत आहेत. शिंदेंचे आमदार अपात्र ठरल्यास पुढची रणनीती काय असेल, यावरून आजच्या दौऱ्यात विचारमंथन होण्याची शक्यता आहे.
  •  सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे-फडवणवीसांविरोधात लागला तर भाजपचा प्लॅन बी काय असेल, यावरही चर्चा घडण्याची शक्यता आहे. या प्लॅन बीची जबाबदारी कुणावर असेल, त्या व्यक्तीचं नावही आज निश्चित होऊ शकतं.
  •  मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा सर्वात महत्त्वाचा मानला जातोय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सध्याच्या पक्षसंघटनाविषयीच्या घडामोडी अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचवतील. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणते पक्ष सोबत घ्यायचे, यावरूनही चर्चा होऊ शकते.
  •  मनसेच्या युतीबाबत चर्चा? अमित शाह यांच्या या दौऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला भाजप-मनसे युतीचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंची साद-भाजपाचा प्रतिसाद अशा प्रकारच्या अनेक घडामोडी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. आता बीएमसी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंची शिवसेना अधिक खिळखिळी करण्यासाठी भाजप लवकरच मनसेशी युती करण्याच्या तयारीत आहे. या मुद्द्यावरही आज महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.