राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देणार का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आझाद मैदानावरील मोर्चाला परवानगी मिळणार की नाही याविषयी जोरदार चर्चा होत आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे (Anil Deshmukh on Azad Maidan MNS Protest).
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आझाद मैदानावरील मोर्चाला परवानगी मिळणार की नाही याविषयी जोरदार चर्चा होत आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे (Anil Deshmukh on Azad Maidan MNS Protest). मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी मोर्चासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याचा विचार करुन त्यांना परवानगी दिली जाईल, असं मत गृहमंत्री देशमुख यांनी व्यक्त केलं (Anil Deshmukh on Azad Maidan MNS Protest).
अनिल देशमुख म्हणाले, “राज ठाकरे यांनी मोर्चाला परवानगी मागितली आहे. त्यांना कोणत्या ठिकाणी परवानगी पाहिजे. यावर सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही निर्णय घेऊ. कायदा सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागायला नको, याचा सर्व विचार करुन त्यांना परवानगी देऊ.”
पोलिसांनी मनसेला मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गावरुन मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मोर्चासाठी भायखळा ते आझाद मैदान या मार्गासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे मनसे नेते अजून चर्चा सुरु असल्याचं म्हणत आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) विरोध करणाऱ्यांच्या मोर्चाला मोर्चानं उत्तर देण्याची भाषा केली. तसेच त्याला उत्तर म्हणून 9 फेब्रुवारीला आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे सुरुवातीला हा मोर्चा सीएएला समर्थन करण्यासाठी असल्याचं बोललं गेलं. मात्र, नंतर मनसेकडून हा मोर्चा भारतातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात असल्याचं स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या :
राज ठाकरेंचा नागरिकत्व कायद्याला पाठिंबा, मनसेचा 9 फेब्रुवारीला मोर्चा!
राज ठाकरेंच्या तीन महत्त्वपूर्ण घोषणा, 25 मार्चला पुन्हा ‘राज’गर्जना
राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, CAA समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवणार
CAA समर्थनावरुन मनसेत मतांतरं, राज ठाकरे पुन्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार
नागरिकत्व कायद्याला समर्थन नाही : राज ठाकरे
CAA, NRC चे समर्थन केले नाही, बेकायदा बांग्लादेशींना हाकला म्हणालो : राज ठाकरे
संबंधित व्हिडीओ: