Loudspeaker Meeting: सकाळी 6 ते रात्री 10 अजानचा भोंगा बंद करता येणार नाही तर मग पर्याय काय? वळसे पाटलांनी ‘केंद्रीय मार्ग’ सांगितला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढले नाही, तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजवण्याचं आवाहन केलं होतं. तसेच ठाण्यातल्या सभेत ठाकरे सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटमच दिला होता. त्याचबरोबर या भोंग्यांच्या मुद्द्यावर जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर त्यानंतर […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढले नाही, तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजवण्याचं आवाहन केलं होतं. तसेच ठाण्यातल्या सभेत ठाकरे सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटमच दिला होता. त्याचबरोबर या भोंग्यांच्या मुद्द्यावर जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर त्यानंतर आम्ही भोंगे आम्ही उतारू असं म्हटलं होतं. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ते भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर बोलत होते. यावेळी त्यांनी सकाळी 6 ते रात्री 10 अजानचा भोंगा बंद करता येणार नाही तर मग पर्याय काय? असा प्रतिसवाल केंद्राला आणि भाजपला विचारला आहे.
राष्ट्रीय पातळीवर धोरण जाहीर करावं
भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात चिघळलेल्या परिस्थितीवर उपाय काढण्यासाठी आज भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात केंद्र सरकारनं राष्ट्रीय पातळीवर धोरण जाहीर करावं अशी मागणी. तसेच त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितलं. तर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत अजानचा भोंगा बंद करता येणार नसल्याचे म्हटले आहे. तर राज्य सरकार फक्त आवाजाची मर्यादा पाळायला लावू शकतं असंही ते म्हणाले.
जी कारवाई करावी लागेल ती करू
यावेळी वळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदुषणासंदर्भातील आदेश २००५ मध्ये दिला. त्याचबरोबर अन्य काही न्यायालयांनीही निर्णय दिले आहेत. त्याआधारे महाराष्ट्र सरकारने २०१५ ते २०१७ या कालावधीत काही जीआर काढले आणि त्याआधारे लाऊडस्पीकरचा वापर, त्याला द्यायची परवानगी, अटी, शर्थी, वेळ आणि आवाजाची मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसात लाऊडस्पीकरच्या वापरासंदर्भात इशारे दिले जात आहेत. पण सरकार भोंग्यासंदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भोंगे लावलेत, वापर करत आहेत त्यांनीच विचार करायचा आहे,” असं दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसेच या बैठकीत राज्य सरकारने कायदा सुरक्षा राखण्यासाठी जी कारवाई करावी लागेल ती करावी या मतापर्यंत आम्ही आलो आहोत असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
It was decided in the meeting that a delegation will meet the Central Government and hold discussions over a solution to this issue (loudspeaker row in the state): Maharashtra Minister Aaditya Thackeray pic.twitter.com/e3AJNhYuRk
— ANI (@ANI) April 25, 2022
भाजपाचे प्रतिनिधी या बैठकीला गैरहजर
तसेच त्यांनी भोंग्यांसदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलावलं होतं. अनेकजण आणि विशेषत: भाजपाचे प्रतिनिधी या बैठकीला गैरहजर राहील्याचं सांगत नाराजी व्यक्त केली. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.