कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय युद्ध टोकाला गेल्याचं पाहायलं मिळतंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांच्या गाडीसह ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर गृहमंत्रालय सतर्क झालंय. आता गृहमंत्रालयाने भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांना बुलेटप्रुफ कार (Buletproof Car) दिली आहे. यापुढील पश्चिम बंगालमधील दौरे त्यांना बुलेटप्रुफ कारमधूनच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत (Home Ministry give Bullet Car to BJP leader Kailash Vijayvargiya in West Bengal).
यावर बोलताना कैलाश विजवर्गीय म्हणाले, “गृह मंत्रालयाने (Home Ministry) मला आदेश दिला आहे. आता मला सामान्य कारमध्ये न बसण्यास सांगण्यात आलं आहे. बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. बंगालमध्ये सामान्य माणसाचा जीव सुरक्षित नाही. दररोज येथे भाजप कार्यकर्त्याची हत्या होत आहे. हे सर्व ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा भाइपोच्या इशाऱ्यावर होत आहे.”
बंगालमध्ये सत्तेची दोन केंद्र ‘ममता आणि भाइपो’
“पश्चिम बंगालमध्ये दोन सत्ता केंद्रं आहेत. येथे ममता बॅनर्जी यांच्या किंवा भाइपो यांच्या इशाऱ्यावर कामं होतात. बंगालमध्ये सत्तेची दोन केंद्र आहेत. त्यातील एक ममता यांची प्रतिमा स्वच्छ दिसते. दुसरा भाइपो असून ते भष्टाचारात अगदी बुडालेले आहेत. त्यामुळे ममतांची प्रतिमा स्वच्छ असली तरी ‘भाइपो’ भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला आहे हे लक्षात घ्यायला हवं. राज्यात भाइपो यांना कमिशन दिल्याशिवाय कोणतंही विकासाचं (Development) काम होत नाही. याशिवाय महापौर असो की मंत्री कुणालाही काम करता येत नाही.”
हेही वाचा :
नड्डांच्या ताफ्यावर हल्ला, केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये; राज्यपालांकडून मागवला रिपोर्ट
जेपी नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी बंगाल पोलिसांकडून 3 एफआयआर दाखल, 7 जण अटकेत
बंगालची लढाई पुन्हा, ममता विरुद्ध ‘बाहरी’? काय काय घडतंय?
Home Ministry give Bullet Car to BJP leader Kailash Vijayvargiya in West Bengal