‘ऑपरेशन भारतवर्ष’: टीव्ही9 च्या स्टिंगमध्ये शिवसेनेच्या खासदाराचा प्रामाणिकपणा उघड

नवी दिल्ली: टीव्ही9 भारतवर्षच्या ‘ऑपरेशन भारतवर्ष’ या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक खासदारांचा भ्रष्ट चेहरा समोर आला असला, तरी काही खासदार असेही आहेत ज्यांनी पैसे घेण्यास किंवा देण्यास स्पष्ट नकार दिला. यामध्ये महाराष्ट्रातील एका खासदाराचाही समावेश आहे. ऑपरेशन भारतवर्षमध्ये काही असेही खासदार समोर आले ज्यांनी निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकारचा काळा पैसा घेण्यास नकार दिला. महाराष्ट्रातील शिर्डी मतदारसंघातून निवडून आलेले […]

‘ऑपरेशन भारतवर्ष’: टीव्ही9 च्या स्टिंगमध्ये शिवसेनेच्या खासदाराचा प्रामाणिकपणा उघड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

नवी दिल्ली: टीव्ही9 भारतवर्षच्या ‘ऑपरेशन भारतवर्ष’ या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक खासदारांचा भ्रष्ट चेहरा समोर आला असला, तरी काही खासदार असेही आहेत ज्यांनी पैसे घेण्यास किंवा देण्यास स्पष्ट नकार दिला. यामध्ये महाराष्ट्रातील एका खासदाराचाही समावेश आहे.

ऑपरेशन भारतवर्षमध्ये काही असेही खासदार समोर आले ज्यांनी निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकारचा काळा पैसा घेण्यास नकार दिला. महाराष्ट्रातील शिर्डी मतदारसंघातून निवडून आलेले खासदार सदाशिव लोखंड यांचाही या प्रामाणिक खासदारांमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त आम आमदी पक्षाचे पतियाळा येथील खासदार डॉ. धर्मवीर गांधी आणि  इंडियन नॅशनल लोकदलाचे सिरसा येथील खासदार चरणजीत सिंह रोडी यांचाही या प्रामाणिक खासदारांमध्ये समावेश आहे.

रुग्णालयासाठी आर्थिक मदत करा

शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्टिंगमध्ये पक्षासाठी 7 कोटी रुपये खर्च केल्याचा खुलासा केला. तसेच चर्चेदरम्यान रुग्णालयाचा उल्लेख करत रुग्णालयासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.

फक्त निवडणूक जिंकणे हा उद्देश नाही

आपचे खासदार धर्मवीर गांधी यांनी निवडणूक खर्चासाठी प्रामाणिक मार्गांचा उपयोग करु, असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी सडेतोडपणे सांगितले फक्त निवडणूक जिंकणे हा आमचा उद्देश नाही.

पैसे घेणारही नाही आणि देणारही नाही

खासदार चरणजीत सिंह रोडी यांनी स्टिंग ऑपरेशमधील छुप्या पत्रकारांना पैसे घेण्यास किंवा देण्यास स्पष्टपणे नकार दिला. तसेच कोणतेही पैसे न घेता मदत करेल असेही आश्वासन दिले.

दरम्यान, टीव्ही9 भारतवर्षच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये देशभरातील 18 खासदारांचा पर्दाफाश झाला होता. यात महाराष्ट्रातील वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांचाही समावेश होता. या खासदारांनी निवडणुकीतील प्रचारासाठी काळा पैसा वापरण्यास तयारी दाखवली होती. त्यात जन अधिकार पक्ष लोकतांत्रिकचे खासदार पप्पू यादव, आम आदमी पक्षाचे खासदार साधू सिंह, भारतीय जनता पक्षाचे खासदार उदित राज, समाजवादी पक्षाचे खासदार नागेंद्र प्रताप सिंह, लोक जनशक्ती पक्षाचे खासदार रामचंद्र पासवान आणि काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांच्यासह एकूण 18 खासदारांचा समावेश होता.

व्हिडीओ पाहा :

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.