मथुरेतून हेमा मालिनी रिंगणात, एकूण संपत्ती किती?

लखनऊ (उत्तर प्रदेश) : भाजपच्या मथुरेतील विद्यमान खासदार आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यंदा पुन्हा भाजपच्या तिकिटावर मथुरेतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. हेमा मालिनी यांनी बुधवारी (27 मार्च) मथुरेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमा मालिनी यांची संपत्ती समोर आली आहे. यामुळे हेमा मालिनी यांच्या संपत्तीवर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियासह […]

मथुरेतून हेमा मालिनी रिंगणात, एकूण संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

लखनऊ (उत्तर प्रदेश) : भाजपच्या मथुरेतील विद्यमान खासदार आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यंदा पुन्हा भाजपच्या तिकिटावर मथुरेतून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. हेमा मालिनी यांनी बुधवारी (27 मार्च) मथुरेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमा मालिनी यांची संपत्ती समोर आली आहे. यामुळे हेमा मालिनी यांच्या संपत्तीवर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियासह सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हेमा मालिनी यांनी निवडणूक आयोगासमोर उमेदवारी अर्जोसोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पाच वर्षामध्ये त्यांची संपत्ती 34 कोटी 46 लाख रुपयांनी वाढली आहे. तर हेमा मालिनी यांचे पती अभिनेते धर्मेंद्र यांची संपत्ती 12 कोटी 30 लाख रुपयांनी वाढली आहे.

हेमा मालिनी यांचे वार्षिक उत्पन्न :

  • 2013-14 मध्ये 15 लाख 93 हजार रुपये
  • 2014-15 मध्ये 3 कोटी 12 लाख रुपये
  • 2015-16 मध्ये 1 कोटी 9 लाख रुपये
  • 2016-17 मध्ये 4 कोटी 30 लाख रुपये
  • 2017-18 मध्ये 1 कोटी 19 लाख रुपये

हेमा मालिनी यांच्याकडे दोन गाड्या आहेत. 2011 साली 33 लाख 62 हजार रुपयांना एक मर्सिडीज, तर 2005 मध्ये 4 लाख 75 हजार रुपयांना एक टोयोटा कार खरेदी केली होती. तर हेमा मालिनी यांचे पती अभिनेते धर्मेंद्र यांच्याकडे 1965 साली खरेदी केलेली कार आहे. त्यावेळी धर्मेंद्र यांनी 7 हजार रुपयांत ती कार खेरदी केली होती. याशिवाय, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या ताफ्यात रेंज रोव्हर, मारुती 800, मोटर सायकलचाही समावेश आहे.

हेमा मालिनी यांची संपत्ती 1 अब्ज 1 कोटी 95 लाख रुपये आहे., तर पती अभिनेते धर्मेंद्र यांची संपत्ती 123 कोटी 85 लाख 12 हजार 136 रुपये आहे.

तसेच, सोनं, फिक्स डिपॉझिट, शेअर्स आणि घर-बंगला याचाही हेमा मालिनी यांच्या संपत्तीत समावेश आहे. हेमा मालिनी यांच्यावर 6 कोटी 75 लाख आणि धर्मेंद्र 7 कोटी 37 लाख रुपयांचे कर्ज आहे. यामधील सर्वात जास्त कर्ज मुंबईतील जुहू येथे बांधण्यात आलेल्या बंगल्यासाठी घेण्यात आलं आहे. जमिनीच्या किंमती वाढल्यामुळे त्यांच्या जुहू येथील बंगल्याची किंमतही 58 कोटींवरुन 1 अब्जावर गेली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.