पाच राज्यांमधील 2013 सालचं चित्र कसं होतं?

मुंबई : राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. राजस्थानमध्ये 200 पैकी 199 जागांवर निवडणूक होत आहे. एका उमेदवाराच्या निधनामुळे त्या मतदारसंघाची निवडणूक नंतर घेतली जाणार आहे. तर तेलंगणाच्या सर्व 119 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या दोन राज्यांसाठी 7 डिसेंबर म्हणजे उद्या मतदान होईल, तर 11 तारखेला निकाल लागणार आहे. यासोबतच 11 तारखेला […]

पाच राज्यांमधील 2013 सालचं चित्र कसं होतं?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. राजस्थानमध्ये 200 पैकी 199 जागांवर निवडणूक होत आहे. एका उमेदवाराच्या निधनामुळे त्या मतदारसंघाची निवडणूक नंतर घेतली जाणार आहे. तर तेलंगणाच्या सर्व 119 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या दोन राज्यांसाठी 7 डिसेंबर म्हणजे उद्या मतदान होईल, तर 11 तारखेला निकाल लागणार आहे. यासोबतच 11 तारखेला मिझोराम, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचाही निकाल असेल. एकाच दिवशी पाच राज्यात सत्ता कुणाची याचा निर्णय होणार आहे.

छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक झाली. तर मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात 28 नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात 7 डिसेंबरला मतदान होईल.

राजस्थान

राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 200 आहे. 2013 सालच्या निवडणुकीत भाजपने 160 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. तर काँग्रेसला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी काँग्रेस आणि भाजपची थेट टक्कर असेल.

तेलंगणा

2014 साली नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसने सत्ता मिळवली होती. पण काही दिवसांपूर्वीच तेलंगणा विधानसभा विसर्जित करण्यात आली. मागच्या निवडणुकीत 119 सदस्यसंख्या असलेल्या तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 90, काँग्रेस 13, एमआयएम सात, भाजप पाच, टीडीपी तीन आणि सीपीआय (एम) ने एका जागेवर विजय मिळवला होता.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या पंधरा वर्षांपासून इथे भाजपची सत्ता आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 जागांसह बहुमत मिळवलं होतं. 231 सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 57, तर बसपाचे चार आमदार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे.

छत्तीसगड

मध्य प्रदेशमधून वेगळं झालेलं छत्तीसगड हे राज्यही गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. 90 विधानसभा सदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगडमध्ये 2013 च्या निवडणुकीत 49 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य टक्कर आहे.

मिझोराम

40 सदस्यसंख्या असलेल्या मिझोराममध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. मिझोराम हे काँग्रेसच्या हातात असलेलं ईशान्येकडील एकमेव राज्य आहे. मिझोराममध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 34 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपचा सध्या या विधानसभेत एकही आमदार नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.