पंकजा मुंडे आमच्या नेत्या, त्यांचा आदेश मान्य : आ. संगिता ठोंबरे
विद्यमान आमदार संगिता ठोंबरे (Namita Mundada Sangita Thombre) यांचा पत्ता कट झाला आहे. पण पंकजा मुंडेंचा आदेश मान्य असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी (Namita Mundada Sangita Thombre) दिली.
बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी भाजपात प्रवेश केला. पण मुंदडा यांना ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, त्या मतदारसंघात सध्याही भाजपचाच आमदार आहे. नमिता मुंदडा यांना भाजपचं तिकीट निश्चित मानलं जातंय. त्यामुळे विद्यमान आमदार संगिता ठोंबरे (Namita Mundada Sangita Thombre) यांचा पत्ता कट झाला आहे. पण पंकजा मुंडेंचा आदेश मान्य असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी (Namita Mundada Sangita Thombre) दिली.
“पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे,” असं म्हणत केजच्या भाजपच्या आमदार संगिता ठोंबरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर बोलताना त्या भावूक झाल्या होत्या.
आपल्याला पंकजा मुंडे यांचा आदेश मान्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करू, असं सांगत त्यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. पंकजा मुंडे यांनी बीडमधील राजकारणात पुन्हा एकदा बेरजेचं गणित जुळवत राष्ट्रवादीला धक्का दिला.
राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करुनही भाजपात, धनंजय मुंडे म्हणतात…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर केलेल्या उमेदवाराला पक्षात प्रवेश देण्याची जी दुर्दैवी वेळ भाजपवर आली, ती भ्रष्ट राजकारणाचा कळस करणारी आहे, जे आपल्या आईला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत ते जनतेला दिलेली आश्वासने काय पाळतील? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय होईल असा दावा केला.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघात विजयाची खात्री नसल्याने त्यांनी मुंदडा यांना सोबत घेतलं आहे. मात्र त्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही, असंही धनंजय यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या :