मला टार्गेट केलं जातंय, माझ्यासारख्या फाटक्याला हरवून तुम्हाला काय मिळणार, अब्दुल सत्तार यांचा इशारा कुणीकडं

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत एकदा मिटिंग झाली होती. बंगल्यावरील बैठकीत छोटी चर्चा झाली होती. लगेच चर्चा समोर आली.

मला टार्गेट केलं जातंय, माझ्यासारख्या फाटक्याला हरवून तुम्हाला काय मिळणार, अब्दुल सत्तार यांचा इशारा कुणीकडं
अब्दुल सत्तार
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 11:12 PM

औरंगाबाद : जवळच्याच काही जणांकडून माझ्याविरोधात कट रचण्यात आलाय. मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलंय. मुख्यमंत्र्यांकडं याची तक्रार केली असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हंटलंय. कुणी कितीही विरोध केला तरी आपण आपलं कार्य सुरूचं ठेवणार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटलय. सत्तार यांच्यावर विरोधकांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यानंतर सत्तार यांनी हे मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलंय.

सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत एकदा मिटिंग झाली होती. बंगल्यावरील बैठकीत छोटी चर्चा झाली होती. लगेच चर्चा समोर आली. आपल्यामधीलच काही लोकं चर्चा समोर काढतात. कोणत्याही पक्षात असं व्हायला नको. लोकशाहीत हे चालत असतं. कोणी कितीही विरोध केला तरी आपण आपलं काम केलं पाहिजे.

अर्ध अधिवेशन हे अब्दुल सत्तार यांच्या भोवती फिरत होतं. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. लोक राज्यभर चर्चा करतात. यावरून वाटतं की, मी पुढारी झालो. मी स्वतःला कार्यकर्ताचं समजतो. राजकारणात राज करण्यासाठी काही कारण शोधावी लागतात. त्यांच्या मनातले ते कारण शोधतात. मी माझ्या मनातले कारण शोधतो, असंही सत्तार यांनी सांगितलं.

मोठा माणूस काहीही बोलतो ते खरचं मानावं लागतं. ते फक्त नेतेचं नाही तर विरोधी पक्षनेते आहेत. मी एका अल्पसंख्यांक समाजाचा माणूस आहे. मी काही फार मोठा नेता नाही. सत्ता पलटविण्यात माझा फक्त खारीचा वाटा आहे.

मला टार्गेट केलं जातंय. माझ्यासारख्या फाटक्या माणसाला हरवून तुम्ही काय कमवून घेणार आहे. तुमच्या बरोबरीच्या माणसाला वेठीस धरा. प्रत्येक वेळी मला एकट्यालाचं टार्गेट केलं जातं, अशी खंतही अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.