मी निवडणूक प्रचारात नाही, पण गरज लागेल तिथे सुप्रियासोबत : सदानंद सुळे
पुणे: राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांनी कौन्सिल हॉलमध्ये आघाडीकडून अर्ज भरला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. यांच्याशिवाय सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि बहीण नीता पाटील […]
पुणे: राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांनी कौन्सिल हॉलमध्ये आघाडीकडून अर्ज भरला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. यांच्याशिवाय सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि बहीण नीता पाटील हे सुद्धा फॉर्म भरताना हजर होते. दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नरपतगिरी चौकात सभा घेऊन सरकार हल्लाबोल केला.
यावेळी सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली. “नोटबंदीने देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मात्र सरकार व्यक्तिगत पातळीवर टीका करत आहे” असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
आम्ही टीका करणार नाही. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे व्यक्तीगत नाही तर विकासावर निवडणूक लढायला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मला कौटुंबीक पाठबळ आहे, त्यामुळे मी ही कठीण परीक्षा समजत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.
यावेळी पती सदानंद सुळे यांनी सुप्रिया जिंकणार असल्याचा दावा केला. सुप्रियाने प्रामाणिक काम केलं आहे. निवडणूक काळातही आम्ही संपर्कात असतो. निवडणूक प्रचारात माझा सहभाग नाही. मात्र गरज लागेल तिथं मी पुढं राहील, असं सदानंद सुळे यांनी यावेळी सांगितलं.