विभक्त पती शिंदे गटात जाणार; सुषमा अंधारे म्हणतात, येणारा प्रत्येक वार झेलण्यासाठी…

माझं का खच्चीकरण होईल असं मी काय केलं? माझ्या आयुष्यात एक नाव सोडून दुसरं नाव जोडलं गेलं का? माझं का म्हणून खच्चीकरण होईल?

विभक्त पती शिंदे गटात जाणार; सुषमा अंधारे म्हणतात, येणारा प्रत्येक वार झेलण्यासाठी...
विभक्त पती शिंदे गटात जाणार; सुषमा अंधारे म्हणतात, येणारा प्रत्येक वार झेलण्यासाठी...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 2:48 PM

पुणे: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवण्यासाठी शिंदे गटाची ही खेळी असल्याचं सांगितलं जात आहे. वाघमारे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे सुषमा अंधारे बॅकफूटवर येतील असं सांगितलं जात आहे. मात्र, हे सर्व दावे सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावले आहेत. मी येणारा कोणताही वार झेलण्यासाठी तयार आहे, असं सांगतानाच वाघमारे यांनी कोणत्या पक्षात जावं आणि कुठे जाऊ नये याचा निर्णय त्यांनीच घेणार आहे. त्याविषयी मी बोलणं योग्य नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारे पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टीकरण दिलं आहे.

जर गेली चार पाच वर्ष मी त्यांच्यापासून विभक्त आहे, तर व्यक्ती म्हणून त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. मी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देईल. ते राजकारणात होते की नाही मला माहीत नाही. त्यांचं नेमकं काय चाललं होतं हेही मला माहीत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं. प्रत्येकाचा भूतकाळ असतो. तो कुरतडण्याचं कारण नाही. भावना गवळी शिंदे गटात आहेत. त्यांचे पती कॅप्टन सुर्वे आमच्या पक्षात आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत. तर त्यांचे चिरंजीव आमच्या पक्षात आहेत. त्यामुळे या टॅक्टिस केवळ राजकीय टॅक्टिस म्हणून पाहते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

प्रत्येक व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्य आहे. मी गेली काही वर्ष त्यांच्यापासून विभक्त आहे. तर त्यांनी काय निर्णय घ्यावा, कुठे जावं? कुठे जाऊ नये? हा त्यांचा प्रश्न आहे. तो विषय चर्चेचा होण्याचं कारण नाही. भविष्यात काय चित्रं असेल हे सांगता येत नाही. पण त्यावेळी कर्तव्य हे श्रेष्ठ असेल. मी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

वैजनाथ वाघमारे तुमच्याबाबत काही गौप्यस्फोट करणार आहेत. काय गौप्यस्फोट असेल? असा सवाल अंधारे यांना विचारण्यात आला. त्यावर, त्यांच्याकडे काही असेल तर मला माहीत नाही. माझं आयुष्य मी स्वाभिमानाने जगते. महिला म्हणून आपण रडतखडत बसावं असं वाटत नाही. प्रत्येक गोष्टी सहन करण्याची माझी तयारी आहे. मी मेंटली तयार आहे. येणारा प्रत्येक वार झेलायला मी तयार आहे, असं त्यांनी सांगितलं.

माझं का खच्चीकरण होईल असं मी काय केलं? माझ्या आयुष्यात एक नाव सोडून दुसरं नाव जोडलं गेलं का? माझं का म्हणून खच्चीकरण होईल? कधी काळी माझ्या आयुष्याचा एक जोडीदार म्हणून जगलेला माणूस, ज्याच्यापासून मी अनेक वर्ष विभक्त राहते, माझं वेगळं आयुष्य जगते.

त्यांच्या जाण्या-येण्याने माझ्या आयुष्यावर परिणाम होतो असं मी का मानावं? किंबहुना मी आता त्यांना माझा मित्र हितचिंतक मानत नसेल तर शत्रू का मानावं? हा मुद्दाच असू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तुमची कायद्याची पदवी बोगस असल्याचं सांगितलं जात आहे, असं विचारलं असता, माझ्याकडे एलएलबीची डिग्री आहे असं मी कधीच म्हटलं नाही. मला हे हस्यास्पद वाटतं. कुणाचा तरी व्यक्तिगत भूतकाळ काढण्याची माध्यमांची जबाबदारी असू नये, असं त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.