मी अजून माघार घेतलेली नाही : अर्जुन खोतकर
जालना: मी अजून जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेली नाही, असं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. एकीकडे भाजपच्या संभाव्य यादीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं नाव असल्यामुळे, अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना अर्जुन खोतकरांनी आपण अद्याप रेसमध्ये असल्याचं म्हटलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माझ्याबाबतीत चर्चा झाल्याची माहिती मला समजली […]
जालना: मी अजून जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेली नाही, असं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. एकीकडे भाजपच्या संभाव्य यादीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं नाव असल्यामुळे, अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना अर्जुन खोतकरांनी आपण अद्याप रेसमध्ये असल्याचं म्हटलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माझ्याबाबतीत चर्चा झाल्याची माहिती मला समजली आहे. पण मी अजून जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली नाही. माझ्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेणार आहेत. मात्र त्यांचा अजून मला कोणताही निरोप आलेला नाही. त्यामुळे आज किंवा उद्या मी त्यांची भेट घेणार आहे, असं शिवसेना नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.
खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली असल्याची चर्चा होती. मात्र आपल्या संदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसून, उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील, असंही खोतकर यांनी स्पष्ट केलं.
खोतकरांकडे समन्वयकाची जबाबदारी
अर्जुन खोतकर यांना शिवसेनेकडून लोकसभेसाठी मराठावाडा विभागाच्या समन्वयपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, खोतकरांच्या जालन्यातील घराबाहेर शिवसैनिकही जमले असून, खोतकरांच्या उमेदावारीसाठी घोषणा दिल्या जात आहेत.
भाजपची संभाव्य 7 उमेदवार
भाजपने पहिल्या यादीतच जालन्यातील उमेदवाराचे नाव निश्चित केले आहे. आज किंवा उद्या भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यात जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांचं आव्हान संपुष्टात आले आहे.
दानवे आणि खोतकरांचा वाद राज्यात तुफान गाजला. दोघांनी एकमेकांवर जाहीरपणे टीका केली. दानवेंविरोधात खोतकरांनी शड्डू ठोकला होता. दानवेंचा पराभव करणारच, अशा घोषणाही खोतकरांनी जालन्यातील सभांमधून जाहीरपणे दिल्या होत्या. मात्र, आता खोतकरांच्या माघारीमुळे दानवेंना मोठा दिलासा मिळणार आहे.
संबंधित बातम्या
अर्जुन खोतकरांचं बंड थंडावलं, एका पदावर बोळवण
शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती