पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता मोडला नियम? कुठे वाढला पक्षाचा ग्राफ
Assembly Election 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचे मंथन केले. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात त्यांना ऐकण्यासाठी मोठा जनसमूह जमला होता. त्यावेळी त्यांनी या विजयाचा एकूणच आढावा घेतला. पंतप्रधानांनी विरोधाकांची पिसं काढली. पण बोलता बोलता त्यांना एक नियम मोडल्याचा उल्लेख केला. त्यावेळी कार्यकर्त्यांना कानात प्राण आणले, कोणता नियम मोडला देशाच्या पंतप्रधानांनी? पण त्याचे नुकसान नाही उलट फायद्याच झाला.
नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचा उन्माद न दाखवता, कार्यकर्त्यांना पुढील ट्रिपल धमाक्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले तर त्याचवेळी त्यांनी विरोधकांना आरसा पण दाखवला. त्यांच्या चुका पण दाखवल्या. विजयाचे मंथन करताना त्यांनी अनेक बाजूंना उजाळा दिला. काँग्रेसची दोन राज्य कशी ताब्यात आली, याचं बोलता बोलता त्यांनी विश्लेषण केले. ओबीसी समाजाला हाताशी धरुन आणि सोशल इंजिनिअरिंगचे महत्व त्यांनी ओघवत्या भाषणात पटवून दिले. या भाषणात त्यांनी बोलता बोलता एक नियम मोडल्याचे सांगितले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांची गर्दी काही काळ स्तब्ध झाली. पंतप्रधानांनी कोणता नियम मोडला आणि दस्तूरखुद्द तेच सांगत आहे, याचं त्यांना नवल वाटलं. पण हा विरोधकांना इशारा होता. आजच्या भाषणात विजयाचे मंथन करतानाच त्यांनी विरोधाकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. देशाच्या पंतप्रधानांनी कोणता नियम मोडला? पण त्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यांनी पटवून दिले.
काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मी कधीच घोषणा करत नाही. भविष्यवाणी करत नाही. मी निवडणुकीत एक नियम तोडला. राजस्थानात काँग्रेस सरकार येणार नाही, अशी त्यांनी भविष्यवाणी केली होती. त्याची त्यांनी आठवण करुन दिली. मी भविष्यवेत्ता नाही. पण माझा राजस्थानातील जनतेवर भरोसा होता. या लोकांवर विश्वास होता, हे त्यांनी दृढपणे सांगितले. भविष्यवाणी न करण्याचा नियम त्यांनी मोडला. पण हीच भविष्यवाणी खरी ठरल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या अधोरेखीत केले.
भाजपमध्ये निवडणुकीपूर्वीच सत्तेचे निमंत्रण
मध्यप्रदेशातही भाजपच्या सेवाभावनेचा कोणताच पर्याय नाही. दोन दशकापासून तिथे भाजपचं सरकार आहे. इतक्या वर्षानंतरही भाजपवरील विश्वास सातत्याने वाढत आहे. छत्तीसगडच्या निवडणूक प्रचारात गेलो. पहिल्याच सभेत त्यांनी जनतेला, आपण काही मागायला आलो नाही. उलट तुम्हाला ३ डिसेंबर रोजी सरकार बनेल त्याचं निमंत्रण द्यायला आल्याचे त्यांनी सांगितल्याची आठवण त्यांनी करुन दिली. छत्तीसगडमध्ये प्रत्येक कुटुंबाने भाजपला स्वीकारल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
तेलंगणात वाढला ग्राफ
त्यांनी तेलंगणाची जनता आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं आभार मानले. प्रत्येक निवडणुकीत तेलंगणातील भाजपचा ग्राफ वाढत आहे. तेलंगणातील जनतेला विश्वास देतो, भाजप तुमच्या सेवेत कोणतीही कसूर ठेवणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 2018 मध्ये भाजपला तेलंगणात केवळ एक उमेदवार निवडून आणता आला होता. भाजपला यावेळी 11 जागांवर आघाडी मिळाली आहे.