तुम्ही मला निवडून दिलं, मी फक्त भारतातच नाही, बाहेरच्या देशातही रस्ते बांधले : गडकरी
नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. नितीन गडकरी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्रात पहिली सभा घेतली आणि प्रचाराचा बिगुल फुंकला. यावेळी गडकरींनी आपण मंत्री म्हणून केलेली कामं जनतेला सांगितली आणि पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं. नागपूरच्या जनतेने मागच्या निवडणुकीत निवडून दिलं. […]
नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. नितीन गडकरी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्रात पहिली सभा घेतली आणि प्रचाराचा बिगुल फुंकला. यावेळी गडकरींनी आपण मंत्री म्हणून केलेली कामं जनतेला सांगितली आणि पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं.
नागपूरच्या जनतेने मागच्या निवडणुकीत निवडून दिलं. त्यामुळे आपण देशातच नाही, तर विदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करू शकलो. ज्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा माझ्या कामाचं कौतुक केलं असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
नागपूर शहर जगातील सुंदर आणि विकसित शहरात यावं यासाठी आपला प्रयत्न असून त्या दृष्टीने शहरात अनेक विकासकामं करण्यात आली आहेत, तर काही कामं करायची असल्याचं गडकरींनी सांगितलं. नागपूरच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधी बाहेर जावं लागायचं. मात्र आता शहरात आयआयएम, सिम्बॉयसिस, ट्रिपल आयटी यांसारख्या जगविख्यात संस्था नागपुरात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासोबतच रोजगाराचा प्रश्न सुद्धा सोडवला जात असल्याचा त्यांनी यावेळी सांगितल.
नागपूर शहरात मेट्रो तर सुरू झालीच, मात्र आजूबाजूची शहरं आणि गावांना जोडण्यासाठी ब्रॉड गेज मेट्रो सुद्धा सुरू केली जाणार आहे. शहराचा विकास करणे हे माझे स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मला मतदान करावं, अशी मागणी सुद्धा गडकरी यांनी मतदारांकडे केली.
गडकरींनी भारताबाहेरच्या कामाचीही माहिती दिली. भारताने आयात-निर्यात वाढण्यासाठी शेजारच्या देशांमध्ये विविध प्रकल्प सुरु केले आहेत. इराणमध्ये भारताने चाबाहार बंदराची बांधणी केली आहे, शिवाय पुढे अफगाणिस्तानमध्ये रस्ते बांधून व्यापार वाढवण्याचाही मानस आहे. तर बांगलादेश, म्यानमार या देशांमध्येही रस्ते आणि जलमार्गाने भारत व्यापार वाढवत आहे. रस्ते, जल आणि जहाज बांधणी ही सर्व खाती गडकरींकडे आहेत.