मी बाळासाहेबांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करणार : प्रदीप शर्मा
प्रदीप शर्मा नालासोपाऱ्यात दाखल झाल्यानंतर एक सभा घेतली. या सभेत शर्मा यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नालासोपाऱ्यात भगवा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले
नालासोपारा : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी नुकतंच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नालासोपाऱ्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये (Pradeep Sharma Shivsena) उत्साह दिसत आहे. कोण आला रे कोण आला पोलीस आला अशा घोषणांसह फटाक्यांनी प्रदीप शर्मा यांचे विरार आणि नालासोपाऱ्यात शिवसैनिकांकडून स्वागत (Pradeep Sharma Shivsena) करण्यात आलं. प्रदीप शर्मा नालासोपाऱ्यात दाखल झाल्यानंतर एक सभा घेतली. या सभेत शर्मा यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नालासोपाऱ्यात भगवा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले
“1985 ला बाळासाहेब ठाकरे नालासोपाऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांना नालासोपाऱ्यात भगवा फडकवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांची ही इच्छा यावेळेस पूर्ण होणार”, असे वक्तव्य प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रदीप शर्मा हे नालासोपाऱ्यातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नालासोपाऱ्यात आयोजित केलेल्या सभेत प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) म्हणाले, “नालासोपाऱ्यात उघडपणे गुंडांकडून महिलांची छेडछाड, दादागिरी असे प्रकार चालतात. हे सर्व संपवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पाठवलं आहे.
“मी जरी उत्तर प्रदेशातील असलो, तरी मी इथलाच स्थायिक आहे. या ठिकाणची गुंडांची दादागिरी संपवणे हा मुलभूत प्रश्न आहे आणि त्यांचा प्रश्न हाच माझा प्रश्न आहे”, असेही शर्मा यावेळी म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनी मला नवीन नालासोपारा निर्माण करण्यासाठी पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.”
मी नालासोपाऱ्यात राहण्यासाठी आलो आहे. त्यामुळे मी या ठिकाणाहून कधीच दुसरीकडे जाणार नाही. मी आणि माझ्या सहकार्याने दाऊदला मुंबई सोडायला लावली होती. त्यामुळे येथे जो दादागिरी करेल तो सोडेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शुक्रवारी (13 सप्टेंबर) प्रदीप शर्मा यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यामुळे येत्या विधानसभेत वसई विरार नालासोपारा येथील आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी प्रदीप शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
कोण आहेत प्रदीप शर्मा ?
प्रदीप शर्मा हे 1983 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. गेल्या अनेक ते वर्षापासून मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकात वरिष्ठ निरीक्षक पदावर ते काम करत होते. पोलिस दलात सर्वाधिक एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा त्यांनी एन्काऊंटर केला आहे. विशेष म्हणजे ‘लष्कर-ए-तोयबा’च्या अतिरेक्यांसह तब्बल 113 गुन्हेगारांच्या एन्काऊंटरची नोंद त्यांच्या नावे आहे.