कमलनाथांनी यूपी, बिहारींना रोखलं, पण राहुल गांधी म्हणतात…
नवी दिल्ली : रोजगार आणि शेतकरी कर्जमाफी या दोन मुद्द्यांवर कमलनाथ यांनी पहिल्याच दिवशी काम सुरु केलंय. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच त्यांनी शेतकरी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळावा यासाठीही एक फाईलवर त्यांनी सही केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. “गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची योजना तेव्हाच लागू […]
नवी दिल्ली : रोजगार आणि शेतकरी कर्जमाफी या दोन मुद्द्यांवर कमलनाथ यांनी पहिल्याच दिवशी काम सुरु केलंय. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच त्यांनी शेतकरी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळावा यासाठीही एक फाईलवर त्यांनी सही केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं.
“गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची योजना तेव्हाच लागू होईल, जेव्हा नोकऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील लोकांना 70 टक्के जागा दिल्या जातील. बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक इथे येतात, त्यांना रोजगार मिळतो आणि स्थानिकांना रोजगार मिळत नाही. यासंबंधी एका फाईलवर मी सही केली आहे,” असं कमलनाथ यांनी सांगितलं. वाचा – राज ठाकरेंचा मुद्दा कमलनाथांनी अंमलात आणला, मध्य प्रदेशात भैय्यांना ‘नो एंट्री’
कमलनाथ यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापलंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पण आपल्याला याबाबत माहिती नसल्याचं ते म्हणाले. शिवाय कमलनाथ यांच्याबाबत याविषयी चर्चा करु असंही राहुल गांधींनी सांगितलं.
मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हे उत्तर भारतीयांसाठी नेहमीच आंदोलन करत असतात. मनसेच्या परप्रांतियांच्या प्रत्येक मुद्द्याला संजय निरुपम यांचा विरोध असतो. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या सरकारने यूपी, बिहारींना एका प्रकारे राज्यात येण्यास अप्रत्यक्ष बंदीच घातली आहे.
महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत बिहारींना नोकरी असो, किंवा राज्यातल्या कंपन्यांमध्ये अनेक परप्रांतियांना नोकरी असो. या सर्व गोष्टींमुळे स्थानिक मात्र रोजगारापासून वंचित राहतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी कमलनाथ यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यासाठीच नेहमी आग्रही भूमिका मांडत असतात.