वाराणसी : देशात सध्या धार्मिक स्थाळांचे वादांचे वादळ घोंगावत आहे. त्याचदरम्यान वाराणसीतील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) वाद ही चांगलांच जागत आहे. त्यात रोज नवं नवे खुलासे होत आहेत. तर हिंदू पक्षकारांकडून अनेक दावे केले जात असताना ते मुस्लिम पक्षाकडून खोडून काढले जात आहेत. यावेळी झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय झाला देताना वाराणसीत कोर्ट कमिशनर अजय मिश्रा (Commissioner Ajay Mishra) यांना हटवले होते. तर ज्ञानवापी मशीदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला होता. तर या ठिकाणी शिवलिंग (Shivling)नसून कारंजा असल्याचा दावा मुस्लिम पक्षाकडून करण्यात आलाय. हिदू पक्षाच्या दाव्यावर मस्लीम पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला होता. अशा सुरू असणाऱ्या दावे प्रतिदाव्या दरम्यान ज्ञानव्यापीतील पक्षकार सोहनलाल सिंह आर्या यांनी आपली प्रतिक्रीया देऊन खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोर्ट कमिश्नरच्या आदेशाने तीन दिवस जो सर्वे झाला त्यावेळी मी आत गेलो होतो. तिथे शिवलिंग आहे. ते स्वयंभू आहे, हा माझा दावा आहे, मी डोळ्याने शिवलिंग पाहिलंय. यानंतर वाराणशीत पुन्हा एकदा वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
औरंगजेबने मंदिर तोडून मशिद केली
यावेळी ज्ञानवापीतील पक्षकार सोहनलाल सिंह आर्या यांनी शिवलिंग संदर्भात दावा केल्यानंतर ते म्हणाले, तिथे शृंगार गौरीचंही मंदीर आहे. त्याचा काही भाग आजही तिथे आहे. औरंगजेबने हे मंदिर तोडून त्यावर मशिद तयार केलीये. मागचा मंदीराचा भाग हा आजही जशाचा तसाच आहे. ज्यावेळी सर्वे झाला मी आत गेलो होतो. तेव्हा तिथे तलाव होता. चिखल गाळ होता, तो जसा हटवण्यात आला आम्हाला शिवलिंग दिसले. त्यावर ज्ञानव्यापी मशिदीच्या पक्षकारांनी तो फवारा असल्याचा दावा केला आहे. पण त्यावर जेव्हा लोखंडी ब्रशने साफसफाई करण्यात आली, तेव्हा कळालं की शिवलिंगावर पाच विटा ठेवून त्याचा आकार बदलण्याचा प्रयत्न गेला असावा.
यानंतर पुरातत्व विभागाने तो फवारा आहे का हे पाहण्यासाठी एक नळी टाकली पण त्यात ती नळी केवळ सहा इंचच आत गेली, यानंतर ती आत गेलीच नाही. तेव्हा आम्ही म्हणटलं की हे शिवलिंग सापडलं. कुणी काही दावा करू द्या पण आम्ही 1991 पासून हा लढा देत आहोत. ओवैसी काही म्हणू द्यात, त्याला आम्ही जूमानत नाही. जे सत्य आहे ते जगाच्या समोर येईलच आणि लोकांना खरं काय ते ही कळेल.
तसेच ज्ञानवापी मशीदीत जो सर्वे झाला आणि त्याचा जो अहवाल जाईल त्यावर आणि न्यायालय जा निर्णय देईल त्यावर आमचा विश्वास आहे. पण उद्या सर्वेक्षणाचा अहवाल दाखल केलं जाईल. त्यावर न्यायालय काय निकाल देणार पाहणं हे ही महत्वाचे असेल.