राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवर बापू पठारे काय म्हणाले?, वाचा पहिली प्रतिक्रिया

मी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटलेलो नाही माझ्या विरोधकांकडून मुद्दामहून अशा चर्चा पसरवल्या जात आहेत. असं बापू पठारे यांनी म्हटलंय. (Ajit Pawar Bapu Pathare)

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवर बापू पठारे काय म्हणाले?, वाचा पहिली प्रतिक्रिया
बापू पठारे
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 2:21 PM

पुणे : भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजप नेते आणि वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारेंच्याही (Bapu Pathare) घरवापसीची चर्चा रंगली आहे. ते भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, मी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) भेटलेलो नाही माझ्या विरोधकांकडून मुद्दामहून अशा चर्चा पसरवल्या जात आहेत. असं बापू पठारे यांनी म्हटलंय. (I had not met to Ajit Pawar said Bapu Pathare)

“मी अजित पवारांना भेटलेलो नाही. त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. माझ्या विरोधी लोकांकडून मुद्दामहून अशा चर्चा पसरवल्या जात आहेत,” असं स्पष्टीकरण बापू पठारे यांनी दिलं.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नगरेसवक तसेच आजी-माजी आमदार आपल्यासाठी सोयीच्या पक्षाची चाचपणी करत आहेत. मागील काही दिवसांपासून पुण्यातील भाजपचे 19 नगरेसवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनतर आता भाजपचे बडे नेते आणि वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे हेसुद्धा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठी पठारे यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झाल्याचीही चर्चा आहे.

बापू पठारेंच्या प्रवेशाचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांकडे

पठारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असल्याचे मत अजित पवारांकडे व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. मात्र, त्यांच्या प्रवेशाचा निर्णय स्थानिक कार्यकर्तेच घेतील, असा पवित्रा अजित पवार यांनी घेतला आहे. असं असलं तरी पठारे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन भापला नामोरहरम करण्याची नामी संधी राष्ट्रवादीकडे आहे.

दरम्यान, अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे. पठारे यांनी पक्षप्रवेशाची चर्चा तथ्यहीन असल्याचं म्हटलं असलं तरी त्यांच्या पवार-पठारे यांच्यात झालेली चर्चा खरी असली तर राष्ट्रवादी या संधीचं सोनं करणार का हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या :

चंद्रकातंदादांचं गणित कच्चं, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष, अब्दुल सत्तारांचा टोला

भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!

‘शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी शक्य ते सर्व करु’, भाजपचे प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

(I had not met to Ajit Pawar said Bapu Pathare)

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.