धनंजय मुंडेंची सर्वात आवडती गोष्ट कोणती? पंकजा म्हणतात…
मुंबई : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडीचा राजकीय वारसा त्यांच्या मुली पंकजा मुंडे आणि पुनम महाजन चालवत आहेत. पंकजा मुंडे राज्याच्या ग्रामविकास मंत्री आहेत, तर पुनम महाजन खासदार असून भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मुंडे-महाजनांचं कौटुंबीक नातं आहे. पंकजा मुंडे आणि पुनम महाजन या बहिणी जेव्हा एकाच व्यासपीठावर आल्या तेव्हा […]
मुंबई : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडीचा राजकीय वारसा त्यांच्या मुली पंकजा मुंडे आणि पुनम महाजन चालवत आहेत. पंकजा मुंडे राज्याच्या ग्रामविकास मंत्री आहेत, तर पुनम महाजन खासदार असून भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मुंडे-महाजनांचं कौटुंबीक नातं आहे. पंकजा मुंडे आणि पुनम महाजन या बहिणी जेव्हा एकाच व्यासपीठावर आल्या तेव्हा त्यांनी अनेक प्रश्नांची मजेदार उत्तरं दिली.
पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांचं राजकीय वैर आहे. पण कलर्स मराठीच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंविषयीच्या आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या गोष्टी विचारण्यात आल्या. पण पंकजा मुंडेंनी इथे त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. अभिनय हीच धनंजय मुंडेंमधली आवडती आणि न आवडणारी गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हा प्रश्न विचारला होत्या. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “अभिनय ही आवडणारी गोष्ट आहे आणि न आवडणारी गोष्टही अभिनय आहे. सध्या राजकारणामध्ये त्यांची जी शैली आहे, ती लोकांना त्यांच्या अभिनयामुळे आवडते. कारण, त्यांचं अभिनयपूर्ण भाषण असतं. मला त्याच्याबद्दल कौतुक वाटतं. पण खटकतं हे, की त्यांची स्वतःची जी शैली आहे, ती दिसतच नाही. कधी कधी मुंडे साहेबांचा भास होतो, कधी प्रमोद महाजनांचा भास होतो. केवळ तोच प्रभाव नाही दिसला पाहिजे, स्वतःही पुढे आलं पाहिजे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
या कार्यक्रमात पुनम महाजन यांनाही अनेक प्रश्न विचारण्यात आले. मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत प्रश्न विचारले. कार्यक्रमाचा पहिला भाग कलर्स मराठीवर 20 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वा आणि दुसरा भाग 21 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता प्रसारित केला जाणार आहे.
व्हिडीओ :
https://www.youtube.com/watch?v=aYONwuKkizI&feature=youtu.be