आमच्या जिल्ह्यात सामना येत नाही, मी तो वाचत नाही, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता मग तो लोकांना कळतो. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात सामना किती येतो? | Gopichand Padalkar

आमच्या जिल्ह्यात सामना येत नाही, मी तो वाचत नाही, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
गोपीचंद पडळकर आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 1:03 PM

सिंधुदुर्ग: सामना हे वृत्तपत्र मी कधी वाचलेही नाही, किंबहुना हा पेपर आमच्या जिल्ह्यात येतही नाही, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले. तुम्ही टीव्हीवर दाखवता म्हणून सामना दैनिक अस्तित्त्वात आहे, हे लोकांना कळते. अन्यथा आमच्या जिल्ह्यात कोणी सामना वाचतही नाही, अशी टिप्पणी पडळकर यांनी केली. (BJP leader Gopichand Padalkar slams Shiv Sena)

गोपीचंद पडळकर हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपवर करण्यात येणाऱ्या टीकेविषयी विचारण्यात आले. तेव्हा गोपीचंद पडळकर यांनी ‘सामना’ची फार दखल घ्यायचे कारण नाही, असे सांगितले.

सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता मग तो लोकांना कळतो. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात सामना किती येतो?, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या जिल्ह्यात सामना येतच नाही, मी तर सामना कधीच वाचला नाही. त्यामुळे असल्या विषयात बोलणं बरोबर नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

‘मनसेची भूमिका योग्य: पडळकर’

गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) भूमिकेचे समर्थन केले. या सरकारला कुठल्याही विषयाचे गांभीर्य नाही. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला. मनसेची भूमिका योग्य आहे. कोरोना झाला म्हणून जर तुम्ही अधिवेशन टाळणार असाल तर महाराष्ट्राची जनता सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. या महाविकास आघाडी सरकारला जनताच रस्त्यावर फिरू देणार नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

‘राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा’

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरुन ‘सामना’च्या अग्रलेखातून सोमवारी मोदी सरकारला लक्ष्य करण्यात आले. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील, असा टोला मोदी सरकारला लगावण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप

‘…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते’ शिवसेनेचा घणाघात

‘संजय राऊतांची बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी’, पडळकरांचा हल्लाबोल

(BJP leader Gopichand Padalkar slams Shiv Sena)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.