मी माझं उपोषण पुढे ढकलतोय, एअर स्ट्राईकमुळे केजरीवालांचा निर्णय
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर हल्ला केला. यामध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. जवळपास सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्व पक्षांची एकजूट असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या. शिवाय भारताच्या कारवाईबद्दल आपण अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना माहिती दिली […]
नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर हल्ला केला. यामध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. जवळपास सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्व पक्षांची एकजूट असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या. शिवाय भारताच्या कारवाईबद्दल आपण अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना माहिती दिली असल्याचंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनाही याबाबत माहिती दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 1 मार्चपासून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी उपोषण करणार होते. पण भारत-पाकिस्तान यांच्यातील सद्यस्थिती पाहता, मी उपोषण पुढे ढकलत असल्याचं केजरीवालांनी जाहीर केलंय. दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातंय.
In view of prevailing Indo Pak situation, I am postponing my upwas for full statehood of Delhi. We all stand as one nation today.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 26, 2019
एअर स्ट्राईकवर कोणता देश काय म्हणाला?
पुलवामा हल्ला झाल्यानंतर जवळपास 50 पेक्षा जास्त देशांनी आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं होतं आणि या हल्ल्याचा निषेधही केला होता. इस्रायलने तर आम्ही लागेल ते भारताला विनाअट देऊ, असं म्हटलं होतं. आता एअर स्ट्राईकनंतरही विविध देशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियननेही भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन केलंय. चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन या देशांनी केलंय.
पाकिस्तानवरील हल्ल्याची इनसाईड स्टोरी | स्पेशल रिपोर्ट