पुलवामा हल्ल्यातील 40 शहिदांच्या संख्येवर मला संशय : अब्दुल्ला
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत, यावर मला संशय येत आहे, असं वादग्रस्त विधान नॅशनल कॉन्फ्रेसचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केलं आहे. फारुक अब्दुल्लांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका सुरु झाली आहे. पुलवामा दहशतवाद हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून दहशतवाद्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. […]
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत, यावर मला संशय येत आहे, असं वादग्रस्त विधान नॅशनल कॉन्फ्रेसचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केलं आहे. फारुक अब्दुल्लांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका सुरु झाली आहे. पुलवामा दहशतवाद हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून दहशतवाद्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले.
फारुक अब्दुल्ला म्हणाले, “छत्तीसगडमध्ये भारताचे किती जवान शहीद झालेत? नरेंद्र मोदी कधी श्रद्धांजली वाहण्यासाठी तिथे गेलेत का? सीआरपीएफचे जे 40 जवान शहीद झाले त्यांच्यावरही मला संशय येत आहे”.
“जी मिसाईल त्यांनी सॅटेलाईट मारण्यासाठी सोडली, ती माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी तयार केली आहे. सध्या निवडणुका सुरु आहेत म्हणून देखावा केला जात आहे”, असा आरोपही अब्दुल्ला यांनी मोदींवर केला.
काही दिवसांपूर्वी एअर स्ट्राईकवरही फारुक अब्दुल्ला यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, “आम्हाला माहित होते की, नेहमीप्रमाणे पाकिस्तानसोबत युद्धाऐवजी छोटी लढाई करणार. मात्र निवडणूक जवळ असल्यामुळे एअरस्ट्राईक करण्यात आली. आम्ही कोटी रुपये किंमतीचा एअरक्राफ्ट गमवून बसलो. नशीब पायलट अभिनंदन सुरक्षित राहिले आणि सुखरुप मायदेशी परतले”.
सर्व पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण योग्य आहे. मात्र जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी योग्य वातावरण का नाही? स्थानिक ग्रामपंचायत निवडणुका शांततेत झाल्या, तसेच इथ मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल उपस्थित आहेत. मग तरीही इथे विधानसभा निवडणूक का होऊ शकत नाही असा प्रश्न अब्दुल्लांनी मोदी सरकारला विचारला आहे.
फारुक अब्दुल्ला श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात 2014 मध्ये निवडणुकीत फारुक अब्दुल्ला यांचा पराभव झाला होता.