मला गृहमंत्रिपद हवं : जितेंद्र आव्हाड
मंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड "मला गृहमंत्रीपद हवं आहे," असे ते (NCP Ministers List jitendra awhad comment) म्हणाले.
ठाणे : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचं जवळपास निश्चित मानलं (NCP Ministers List jitendra awhad comment) जात आहे. तर नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह 13 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड “मला गृहमंत्रीपद हवं आहे,” असे ते (NCP Ministers List jitendra awhad comment) म्हणाले.
“गेल्या 32 वर्षे शरद पवारांसोबत काम केलं आहे. आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार करताना सगळे मोठे पोर, सर्व साखर कारखानदार, सर्व मोठी लोक आजूबाजूला असताना सर्वसामान्य परिस्थितीतून येथे येताना पवारांनी हाताला धरुन किंवा करंगळीला धरुन चालवलं. त्याबद्दल कायम उपकाराची किंवा कृतज्ञतेची भावना मनात असेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.”
“तुम्हाला कोणतं मंत्रिमंडळ आवडले असे जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब आणि तुम्ही विचारता कोणंत मंत्रिमंडळ देऊ. मला गृह हवं आहे. देताय का सांगा. मला गृहमंत्रिपद हवं असे तुम्ही बिनधास्त चालवा.” असेही आव्हाड हसत हसत (NCP Ministers List jitendra awhad comment) म्हणाले.”
“आपण आपली गरिबी कधीही विसरायची नाही. सगळे प्रश्न सोपे असतात. आपण बघितलेल्या गरिबीतून इथपर्यंत पोहोचलो आहोत. आपण जी मेहनत घेतली आहे. ती इतर कोणला पडू नये यासाठी या गरीबाचा उद्धार व्हावा आणि हा गरीब सुखी व्हावा यासाठी मनात विचार केला की कोणतीच परिस्थिती आव्हानात्मक नसते. सर्व सोप होतं. असेही आव्हाड म्हणाले.”
“मी माझ्या नेत्याशी विचाराशी फार प्रामाणिक आहे. दुराव मधील ‘दु’ सुद्धा माझ्या विचारात येत नाही. त्यामुळे मी यावर बोलणार नाही.” असेही ते (NCP Ministers List jitendra awhad comment) म्हणाले.
“गरीबांच्या डोळ्यातील अश्रू, तो गाळत असलेला घाम याचं कौतुक असेल. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची तुमचे हात सरसावणार असतील. तर सर्व काम सोपी आहेत.” असेही आव्हाड म्हणाले.
“जो क्षण माझ्या आईवडिलांना बघायला मिळाला नाही. नशिबाने माझ्या मुलीला बघायला मिळतो आहे. तिच्या दृष्टीने आणि माझ्या दृष्टीने आज आनंदाचा क्षण आहे. कदाचित तिच्या नशिबामुळे मला हा दिवस बघायला मिळतो. असे मी नेहमी म्हणतो.” असेही जितेंद्र आव्हाड (NCP Ministers List jitendra awhad comment) म्हणाले.
“शरद पवारांचा फोन हे म्हणजे माझं हार्टबीट वाढण्यासारखं आहे. समोरुन ते काय बोलतील याचा अंदाज नसतो. त्याच्याविषयीचा भितीयुक्त आदर हे माझ्या जीवनाच्या यशाचे गमक आहे. त्यामुळे मी फार कमी वेळा चुकतो किंवा अडचणीत येतो. पवारांचा फोन आणि हार्टबीट वाढणं हे एक समीकरणं आहे. आयुष्यात फक्त दोन वेळा ते रागवले आहेत. गेल्या 32 वर्षात ते माझ्यावर कधीही रागावलं आहेत याचा आनंद आहे.”
“मी जो काही कार्यकर्त्यांमुळे आहेत. प्रत्येक कार्यकर्ता घराघरात गेला म्हणून मी जिंकलो. कार्यकर्ता आहे म्हणून मी आहे.” असेही आव्हाड यावेळी (NCP Ministers List jitendra awhad comment) म्हणाले.