काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राईक सैन्यालाही समजले नाही : राज्यवर्धनसिंह राठोड

नवी दिल्ली : यूपीए सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले, असं म्हणत काँग्रेसने स्थळ आणि तारखाही जाहीर केल्या आहेत. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा दावा केला. आम्ही सर्जिकल स्ट्राईकनंतर कधीही पाठ थोपटून घेतली नाही, पण आज ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला, ते स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, असं राजीव शुक्ला म्हणाले. […]

काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राईक सैन्यालाही समजले नाही : राज्यवर्धनसिंह राठोड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

नवी दिल्ली : यूपीए सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले, असं म्हणत काँग्रेसने स्थळ आणि तारखाही जाहीर केल्या आहेत. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा दावा केला. आम्ही सर्जिकल स्ट्राईकनंतर कधीही पाठ थोपटून घेतली नाही, पण आज ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला, ते स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, असं राजीव शुक्ला म्हणाले.

काँग्रेसच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दाव्यावर केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी लष्करी अधिकारी राज्यवर्धन राठोड यांनी प्रत्युत्तर दिलंय. सैन्यात तर मी होतो, आम्हाला माहित नाही हे कधी झालं. सर्व सैन्य आज भाजपसोबत आहे, त्यांचा पाठिंबा असाच नाही मिळालाय, कारण आम्हाला माहित आहे तिथे काय होतं, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.

लष्करी अधिकारी असण्यासोबतच राज्यवर्धन राठोड नेमबाजही होते. भारतासाठी त्यांनी 2002 च्या कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्ण पदक, 2006 च्या मेलबर्न कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुन्हा सुवर्ण पदक आणि 2004 च्या एथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाला रौप्य पदक मिळवून दिलं होतं. कर्णल म्हणून ते सैन्यातून निवृत्त झाले.

काँग्रेसकडून सहा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा

काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक केली असल्याचं सांगितलं. शिवाय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक झाल्या, असं काँग्रेसने सांगितलंय. ठिकाण आणि तारखा पुढीलप्रमाणे –

19 जून 2008 रोजी जम्मू काश्मीरमधील पूँछ येथील भट्टल सेक्टर

30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2011 या काळात नीलम नदी खोऱ्यात शारदा सेक्टर

6 जानेवारी 2013 रोजी सावन पत्रा चेकपोस्ट

27-28 जुलै 2013 रोजी नजीरपीर सेक्टर

6 ऑगस्ट 2013 रोजी नीलम नदी खोऱ्यात

14 जानेवारी 2014 रोजी सहावा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.