मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सलमान खान

मुंबई : अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती. मात्र या चर्चेवर सलमान खानने गुरुवारी ट्वीट करत पूर्णविराम दिला आहे. मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसंच कोणत्या पक्षाचा प्रचार करणार नाही, अशी माहिती सलमान खानने ट्विटरवरुन दिली. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सलमान खान आणि आमिर खान यांना […]

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सलमान खान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती. मात्र या चर्चेवर सलमान खानने गुरुवारी ट्वीट करत पूर्णविराम दिला आहे. मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसंच कोणत्या पक्षाचा प्रचार करणार नाही, अशी माहिती सलमान खानने ट्विटरवरुन दिली.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सलमान खान आणि आमिर खान यांना टॅग करत एक ट्वीट केले होते. त्यात मोदींनी म्हटलं होते की, “मतदान करणे फक्त अधिकार नाही, तर ते आपले कर्तव्य आहे. ही वेळ देशातील तरुणांना आपल्या इच्छेनुसार मतदान करण्यासाठी आम्ही प्रेरित करत आहे. यामुळे आपण आपल्या लोकशाहीला आणि देशाला मजबूत करु शकतो. यावर सलमान खानने मोदींच्या ट्वीटला उत्तर देत लिहिलं की, “आपण लोकशाहीत राहतो, मतदान करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा असे मी सर्व मतदारांना आवाहन करतो”.

मध्य प्रदेश काँग्रेसकडून अभिनेता सलमान खानला राजधानी इंदूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरवण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात 30 वर्षांनी काँग्रेसला विजय मिळवणे शक्य झाले असते. मात्र सलमान खानच्या नकारामुळे काँग्रेसला आता भाजपचा 30 वर्षाचा बालेकिल्ला काबीज करणे कठीण होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सलमान खानचा जन्म इंदुरच्या पलासियामध्ये झाला होता. मुंबईत येण्याआधी सलमानचं बालपण इंदूरमध्ये घालवलं आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते पंकज चतुव्रेदी म्हणाले, सलमान खानसोबत इंदूरमध्ये पक्षाचा प्रचार करण्यासाठी आमचं बोलणं झालं आहे. मात्र सलमान खानने राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....