माझी लायकी काय ते निवडणुकीत दाखवतो, गोपीचंद पडळकरांचं संजय पाटलांना आव्हान

सांगली : माझी लायकी काढणारे सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील, मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. कुणाची किती लायकी आहे ती आत्ता कळेल. माझा पक्ष अजून निश्चित नाही, मात्र जो पक्ष देईल ती उमेदवारी, नाही तर अपक्ष, मात्र मी निवडणूक नक्की लढवणार आहे, असा निर्धार भाजपाचे नाराज नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर […]

माझी लायकी काय ते निवडणुकीत दाखवतो, गोपीचंद पडळकरांचं संजय पाटलांना आव्हान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

सांगली : माझी लायकी काढणारे सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील, मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. कुणाची किती लायकी आहे ती आत्ता कळेल. माझा पक्ष अजून निश्चित नाही, मात्र जो पक्ष देईल ती उमेदवारी, नाही तर अपक्ष, मात्र मी निवडणूक नक्की लढवणार आहे, असा निर्धार भाजपाचे नाराज नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे गोपीचंद पडळकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी टीव्ही 9 मराठीच्या सांगलीत झालेल्या लालकिल्ला एक्सप्रेस या कार्यक्रमात सांगलीचे भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी या कार्यक्रमा दरम्यान पडळकर आणि संजय काका यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु होते. यावेळी खासदार संजय पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना आव्हान देत एवढा लायकीचा असशील तर निवडणुकीला उभा राहा, असं जाहीर आव्हान दिलं होतं. या मुद्द्याला धरून गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका मांडली.

भाजपच्या नेत्यांना माझं आवाहन आहे की, भाजपची उमेदवारी संजय पाटील यांना जाहीर करा. लायकी कुणाची काय आहे हे जनता दाखवेल, असं सांगून पडळकर पुढे म्हणाले, खासदार संजय काका पाटील यांनी भाजपात राहून, पक्षाविषयी गद्दारी केली. तुम्ही संजय काका पाटील खासदार असताना सुद्धा, 2014 ला तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे हे 28 हजार मतांनी हरले कसे? तुमची त्याच वेळेला लायकी कळली होती, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.

संजय काका पाटलांचं तिकीट कापणार?

या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक संभाव्य उमेदवाराच्या मनात धाकधूक कायम आहे. त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार संजय (काका) पाटील यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. त्याचं कारण म्हणजे संजय काकांच्या उमेदवारीला भाजपमधूनच असलेला विरोध.

संजय (काका) पाटील यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रतिक पाटील यांचा विक्रमी सव्वा दोन लाख मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या संजय काका यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उघड मदत केली होती. खासदार झाल्यानंतर विकासकामे आणि जनसंपर्क या संजय काकांच्या जमेच्या बाजू असल्या तरी, संजय काका यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी असलेली जवळीक ही भाजप आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना खटकत होती. त्यातच संजय काका यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद आणि मंत्रीपदाचा दर्जा दिला. मात्र जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना मंत्री पद दिलं नाही. त्यामुळे नाराजी आहे.

आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.