मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन: एकनाथ खडसे

‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. | Eknath Khadse

मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन: एकनाथ खडसे
Eknath Khadse
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 11:41 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’ने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एकनाथ खडसे यांनी अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. ही नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असे त्यांनी टीव्ही 9 मराठी’ला सांगितले. (ED issues summons to NCP leader Eknath Khadse)

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ईडी’ला एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध नक्की कोणते पुरावे मिळाले आहेत, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळून मी भाजप सोडत असल्याचे ते म्हणाले होते. माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता ईडीची नोटीस आल्यावर खडसे सीडी लावून धमाका करणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजपची हुकूमशाही, ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार, अमोल मिटकरींचा इशारा

ईडीने एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी नोटीस पाठवल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपची ही हुकूमशाही सुरु आहे. ईडीची नोटीस ही सूडबुद्धीने देण्यात आली आहे. मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठवली होती. आता खडसेंना पाठवली आहे. खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप मिटकरींनी केला.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून चौकशीची नोटीस

भाजपची हुकूमशाही, ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार, अमोल मिटकरींचा इशारा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.