IAS Transfer | चंद्रकांत पाटलांकडून सकाळी ‘ट्रान्सफर मंत्रालय’ खिल्ली, दुपारी चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली

डॉ. कुणाल खेमनार यांना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

IAS Transfer | चंद्रकांत पाटलांकडून सकाळी 'ट्रान्सफर मंत्रालय' खिल्ली, दुपारी चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 4:43 PM

मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या ट्रान्स्फर करण्यात आल्या आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची पुणे महापालिकेत बदली झाली आहे. चार प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बदल्यांच्या मुद्दयाबाबत आज सकाळीच ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. (IAS Officer Transfer in Maharashtra including Dr Kunal Khemnar)

मुंबईतील हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाल्याने हे पद रिक्त होते. आता ए. शैला यांना हाफकिन इन्स्टिट्यूटच्या एमडीपदाची धुरा देण्यात आली आहे.

सुरुवातीला हाफकिनचे एमडी म्हणून डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली होती. खेमनार यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन काही दिवसांपूर्वी बदली झाली आहे. मात्र आता खेमनार यांना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

व्ही. बी. पाटील यांची अन्न व नागरी पुरवठा विभागात सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर पुण्यातील भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदावर वर्णी लागली आहे.

दहाच दिवसांपूर्वी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली झाली होती. तर अवघ्या तीन दिवसांपूर्वी डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळीच ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. “महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नाव – ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री – कोणी एक दोन नाहीत, तर अनेक… या मंत्रालयाचं ‘बजेट’ नाही… ‘टार्गेट’ असतं” अशी टीका त्यांनी केली होती. (IAS Officer Transfer in Maharashtra including Dr Kunal Khemnar)

संबंधित बातम्या :

मिलिंद म्हैसकर यांच्यासह राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली

पुणे जिल्हाधिकारीपदाचा पेच सुटला, राजेश देशमुख यांची वर्णी

(IAS Officer Transfer in Maharashtra including Dr Kunal Khemnar)

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....