“मी ही सिंधुदुर्गातला आहे, लक्षात ठेवा!” उदय सामंत यांचा राणेंना टोला
मीही सिंधुदुर्गातला आहे, हे लक्षात ठेवा," असा टोला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते नारायण राणे यांना (uday samant on narayan rane) लगावला.
सिंधुदुर्ग : “मी नाहक कोणाला त्रास देणार नाही. पण आम्हाला कोणी त्रास दिला, तर मीही सिंधुदुर्गातला आहे, हे लक्षात ठेवा,” असा टोला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते नारायण राणे यांना (uday samant on narayan rane) लगावला. कणकवलीतील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर उदय सामंत प्रथमच सिंधुदुर्गात आले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर उदय सामंत यांच्यासह कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, अरुण दुधवडकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी राणेंवर जोरदार टीका (uday samant on narayan rane) केली.
“उदय सामंत एलईडी मासेमारीला ठाम विरोध करणार आहे. त्यामुळे कोणीही याबाबत गैरसमज करुन घेऊ नये.” असेही ते यावेळी म्हणाले.
“मी नाहक कोणालाही त्रास देणार नाही. पण आम्हाला कोणी त्रास दिला तर मीही सिंधुदुर्गातला आहे हे लक्षात ठेवा,” असा टोलाही सामंत यांनी नारायण राणेंना लगावला.
मात्र शिवसेनेचे नाराज नेते आमदार दीपक केसरकर हे यावेळी अनुपस्थितीत होते. याबाबत स्पष्टीकरण देताना सामंत म्हणाले, “दीपक केसरकर जिल्ह्याबाहेर गेले आहेत. ते माझ्याशी बोलून गेले आहेत, ते इथे नाहीत म्हणून कोणी गैरसमज करून घेऊ नये.” असेही उदय सामंत (uday samant on narayan rane) म्हणाले.