चंद्रकांत पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे- नवाब मलिक

| Updated on: Nov 03, 2020 | 9:54 PM

निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचे डिपॉझिट करण्याची ताकद आमच्यात आहे| Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे- नवाब मलिक
Follow us on

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर किंवा कोल्हापुरमधून निवडणूक लढवूनच दाखवावी. आम्ही त्यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाला नवाब मलिक यांनी जोरदार उत्तर दिले. तुळजापूर विधानसभा ही भाजपकडे आहे. त्या आमदारांचा राजीनामा घ्या आणि भाजपची हिंमत असेल तेथील आमदाराचा राजीनामा घेऊन चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवावी. त्यांना पराभूत कसे करायचे हे आम्ही दाखवून देऊ, असे जाहीर आव्हान नवाब मलिक यांनी दिले. (NCP leader Nawab malik take a dig at Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोथरुड येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. मी कोल्हापूर सोडून कोथरुडमधून निवडणूक लढलो म्हणून मी पळून आलो, असे विरोधक म्हणतात. माझी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची तयारी आहे. हवं तर कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा, मी पोटनिवडणुकीला उभा राहीन. या निवडणुकीत जिंकून आलो नाही तर मी हिमालयात निघून जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितले होते.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले. कोल्हापूरमधील आमदाराचा राजीनामा घ्यावा. भाजपने त्या जागेवर चंद्रकांत पाटील यांना उभे करावे. निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचे डिपॉझिट करण्याची ताकद आमच्यात आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

यावेळी नवाब मलिक यांनी कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र व राज्य सरकारमध्ये रंगलेल्या संघर्षाविषयीही भाष्य केले. कांजूरमार्ग कारशेडची जागा राज्य सरकारचीच आहे. खारजमीन विभागाने त्याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करू नये. न्यायालयाने त्यावर स्थगिती दिलेली नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

‘चंद्रकांतदादा आता संधी गेली, कोल्हापुरातून लढण्याचा निर्णय तेव्हाच घ्यायला पाहिजे होता’
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय 2019 सालीच घ्यायला पाहिजे होता. आता ती संधी निघून गेली आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील आता कोल्हापुरातील मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची भाषा करत आहेत. मात्र, आता यावरील चर्चेला अर्थ उरलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. मग तुम्ही कोणाला राजीनामा द्यायला लावणार, असा सवाल सतेज पाटील यांनी विचारला होता.

संबंधित बातम्या:

मेधा कुलकर्णींना पदवीधर मतदारसंघाचे तिकीट तरी देणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात…

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर राजकारण सोडून हिमालयात जाईन -चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच

(NCP leader Nawab malik take a dig at Chandrakant Patil)