सरकार आल्यास 22 लाख नोकऱ्या देणार, राहुल गांधींची मोठी घोषणा
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार आल्यास 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख रिक्त सरकारी पदांची भरती केली जाईल, असे आश्वासन राहुल गांधींनी दिले आहे. गांधी यांनी याआधी ‘न्याय’ या योजनेचीही घोषणा केलेली आहे. राहुल गांधी यांनी […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार आल्यास 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख रिक्त सरकारी पदांची भरती केली जाईल, असे आश्वासन राहुल गांधींनी दिले आहे. गांधी यांनी याआधी ‘न्याय’ या योजनेचीही घोषणा केलेली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट केले, “आज सरकारच्या विविध विभागांमध्ये 22 लाख नोकऱ्या रिक्त आहेत. आम्ही 31 मार्च 2020 पर्यंत या रिक्त जागा भरू. आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांसाठी केंद्राकडून प्रत्येक राज्याला सरकारी निधीच्या होणाऱ्या हस्तांतरणाशी या रिक्त पदांना जोडले जाईल.”
25 कोटी नागरिकांच्या थेट खात्यात वार्षिक 72,000 रुपये देणार
याआधी राहुल गांधींनी आपला पक्ष सत्तेत आल्यास ‘न्याय’ म्हणजेच किमान वेतन योजना आणि खरा जीएसटी आणण्याचीही घोषणा केली आहे. सोमवारी घोषणा केलेल्या न्याय योजने अंतर्गत देशातील 5 कोटी कुटुंबांना आणि 25 कोटी नागरिकांच्या थेट खात्यात वार्षिक 72,000 रुपये देणार आहेत. दुसरीकडे चिदंबरम यांनी या योजनेचे समर्थन करत अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच या योजनेची घोषणा केल्याचे म्हटले होते. तसेच 2019 ते 2024 दरम्यान देशाचे दरडोई उत्पन्न (जीडीपी) वाढणार असल्याने या तज्ज्ञांनी भारतात ही योजना लागू करणे सहज शक्य असल्याचे सांगितले आहे, असेही चिदंबरम यांनी नमूद केले.
चिदंबरम यांच्यानुसार गरीबी निर्मुलनासाठी किमान वेतन असणे आवश्यक आहे. तसेच भारतासारख्या देशात ही योजना केवळ टप्प्यांमध्ये लागू केली जाऊ शकतो. या योजनेंतर्गत जवळजवळ 5 कोटी कुटुंबांचा सहभाग असेल. योजनेची अंमलबजावणी तज्ज्ञांच्या समितीकडून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ: