राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास काय होईल?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. देशात आणि राज्यात राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. राज्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच वरचष्मा राखला आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झालास तर काय होईल, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी केंद्रीय […]

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास काय होईल?
Follow us
| Updated on: May 30, 2019 | 5:13 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. देशात आणि राज्यात राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. राज्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच वरचष्मा राखला आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झालास तर काय होईल, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची वाढ महाराष्ट्रासह राज्याबाहेरही केली. राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांसह विविध लोकप्रतिनिधींच्या संख्येतही निवडणुकीगणिक लक्षणीय वाढ होत गेली आहे.

दुसरीकडे, काँग्रेस पक्ष हा सव्वाशे वर्षे जुना पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारला आहे. काँग्रेसचे देशभरात विविध सभागृहांमध्ये लोकप्रतिनिधी आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, जर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला, तर काय होईल? महाराष्ट्रात आणि देशात या दोन्ही पक्षांच्या संयुक्त पक्षाची म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किती जागा होतील, याची चाचपणी आम्ही केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास :

  • विधानसभेत काय स्थिती असेल?

2014 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढले. त्यावेळी काँग्रेसने 42 आणि राष्ट्रवादीने 41 एवढ्या जागा जिंकल्या. त्यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला, तर दोन्हींच्या मिळून एकूण 83 एवढ्या जागा होतील.

  • लोकसभेत काय स्थिती असेल?

2019 ची लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत, आघाडी करत लढली. मात्र, मोदी लाटेसमोर या दोन्ही पक्षांचा फारसा निभाव लागला नाही. तरीही काँग्रेसने देशभरत अर्धशतकी जागा आणि राष्ट्रवादीने राज्यात काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकी देशभरात काँग्रेसला 52 आणि राष्ट्रवादीला एकूण 5 जागा मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला, तर दोन्ही पक्षांच्या मिळून एकूण 57 एवढ्या जागा लोकसभेत होतील.

दरम्यान राष्ट्रवादीचे राज्यसभेत 3 खासदार, तर महाराष्ट्र विधानपरिषदेत 17 आमदार आहेत.

संबंधित बातम्या :

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार : सूत्र

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.