मदत नाही तर नाही, विरोध तर करु नका, धनंजय महाडिक हतबल

कोल्हापूर: “काँग्रेस आमदार सतेज पाटील स्वतःला राहुल गांधीपेक्षा मोठे समजतात. मला मदत नाही केली तरी ठीक आहे, पण त्यांनी विरोध करायला नको होता”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी म्हटलं. धनंजय महाडिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र एकमेकांचे हाडवैरी असलेले सतेज उर्फ बंटी पाटील आणि धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यातील वैर आजही […]

मदत नाही तर नाही, विरोध तर करु नका, धनंजय महाडिक हतबल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

कोल्हापूर: “काँग्रेस आमदार सतेज पाटील स्वतःला राहुल गांधीपेक्षा मोठे समजतात. मला मदत नाही केली तरी ठीक आहे, पण त्यांनी विरोध करायला नको होता”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी म्हटलं. धनंजय महाडिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र एकमेकांचे हाडवैरी असलेले सतेज उर्फ बंटी पाटील आणि धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यातील वैर आजही दिसून आलं. सतेज पाटील हे मुन्ना महाडिकांचा अर्ज भरण्यास अनुपस्थित राहिले.

कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे.

धनंजय महाडिक यांनी आज अर्ज भरल्यानंतर सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सतेज पाटील हे स्वत:ला राहुल गांधींपेक्षा मोठं समजतात. त्यांनी मला मदत केली नाही तरी चालेल, पण विरोध तर करु नये. सतेज पाटील हे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करतात. त्यांच्या पक्षाला म्हणजेच काँग्रेसला हे कितपत रुचेल याबद्दल शंका आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.

सतेज पाटील हे राहुल गांधी आणि शरद पवार यांना विरोध करतात, असं धनंजय महाडिक म्हणाले.

सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचं वैर काय?

डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत. हे दोघेही एकमेकांचे हाडवैरी आहेत. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. त्यानंतर सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यासोबतचं वैर विसरुन, त्यांना निवडून आणण्याची शपथ घेतली होती. इतकंच नाही तर मोदी लाटेत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार निवडूनही आले होते. सतेज पाटलांच्या पाठिंब्यामुळे धनंजय महाडिक निवडून आले.

मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपकडून धनंजय महाडिकांचा चुलत भाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक उभे राहिले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँटे की लढाई झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांना हरवण्यासाठी धनंजय महाडिक यांनी प्रचंड जोर लावला. त्याचा परिणाम म्हणून तत्कालिन गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू बनले. लोकसभा निवडणुकीत मदत करुनही धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे.

याशिवाय काँग्रेसचे विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार असलेले महादेवराव महाडिक यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता, निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या मुलाचा प्रचार करुन, सतेज पाटील यांचा पराभव केला.

या सर्वांचा वचपा सतेज पाटील यांनी 2015 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काढला. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. तेव्हापासून महाडिक विरुद्ध बंटी असा सामना कोल्हापुरात सातत्याने रंगला आहे. मग ती जिल्हा परिषद निवडणूक असो, महापालिका निवडणूक असो, गोकुळ दूधसंघ निवडणूक असो वा साखर कारखान्याची निवडणूक असो, सर्व ठिकाणी मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना पाहायला मिळतो.

दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुकीचं मतदान येऊन ठेपलं असताना, बंटी-मुन्ना वाद सुटता सुटत नाही. त्यामुळे आघाडीत कोल्हापूरवरुन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

VIDEO : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता : सतेज पाटील  

ज्यांच्या मनधरणीसाठी जयंत पाटील कोल्हापुरात, ते सतेज पाटीलच जिल्ह्याबाहेर!  

बंटी-मुन्ना वाद मिटवण्यात वेळ घालवणार नाही: हसन मुश्रीफ  

…तर सतेज पाटलांची भेट घेईन: मुन्ना महाडिक 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.