जर रामाची मूर्ती बनवली जाऊ शकते, तर माझी का नाही? : मायावती
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) शासनकाळात बनवण्यात आलेल्या मूर्तींवरील खर्चाचा मुद्दा मायावतींना चांगलाच अडचणी ठरला आहे. त्यामुळे आपण याप्रकरणात वेगळे काहीच केले नसल्याचे सांगताना मायवती यांनी आपली तुलना थेट भगवान राम यांच्याशी केली आहे. तसेच रामाची मूर्ती बनवली जाऊ शकते, तर माझी का नाही? असा प्रश्नही उपस्थित केला. सध्या मायावतींचे मूर्तीप्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. […]
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) शासनकाळात बनवण्यात आलेल्या मूर्तींवरील खर्चाचा मुद्दा मायावतींना चांगलाच अडचणी ठरला आहे. त्यामुळे आपण याप्रकरणात वेगळे काहीच केले नसल्याचे सांगताना मायवती यांनी आपली तुलना थेट भगवान राम यांच्याशी केली आहे. तसेच रामाची मूर्ती बनवली जाऊ शकते, तर माझी का नाही? असा प्रश्नही उपस्थित केला.
सध्या मायावतींचे मूर्तीप्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मायावती यांनी आपल्या आणि आपले निवडणूक चिन्ह हत्तीच्या अनेक मूर्ती बनवल्या होत्या. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले, जर भगवान राम आणि इतर लोकांच्या मूर्ती बनू शकतात, तर माझ्या का नाही. मी लोकांच्या सेवेसाठी लग्नही केलेले नाही.
प्रत्येक सरकारने मुर्ती बनवल्या
मायावती यांनी अयोध्येत प्रस्तावित 221 मीटर उंच भगवान राम यांच्या मूर्तीचा उल्लेख करताना त्या मूर्तीवर प्रश्न का उपस्थित होत नाही? अशीही विचारणा केली. मायावती यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी मूर्ती बनवणे काही नवे नसल्याचे म्हटले आहे. तसेच याआधीही अनेक सरकारांनी असे केल्याचे नमूद केले. काँग्रेसनेही जनतेच्या पैशांनी आपल्या सत्तेच्या काळात नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या मूर्ती बनवल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
व्हिडीओ पाहा: