Uddhav Thackeray : दसरा मेळावा तर शिवतीर्थावरच, पदामुळे बंधने आता रोखठोक भूमिका, पक्षप्रमुखांमध्ये नेमका कोणता बदल दिसणार?

मला पद पाहिजे असते तर मी ते एवढ्या सहजासहजी सोडलेच नसते. पण तो आपला स्वभाव नाही. रहायचे असेल तर निष्ठा महत्वाचे आहे. पसाभर असण्यापेक्षा मूठभर हे निष्ठावंत असलेले कधीही चांगलेच. त्यामुळे जे गेले त्यांचा विचार न करता शिवसेनेची एक वेगळी रणनीती ठरणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांचे आभारही मानले.

Uddhav Thackeray : दसरा मेळावा तर शिवतीर्थावरच, पदामुळे बंधने आता रोखठोक भूमिका, पक्षप्रमुखांमध्ये नेमका कोणता बदल दिसणार?
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 5:18 PM

मुंबई : शिवसेनेचा यंदाचा (Dussehra Gathering) दसरा मेळावा नेमका कुठे होणार यावरुन गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. मात्र, काहीही झाले तरी मेळावा हा (Shiv tirtha) शिवतीर्थावरच होणार यावर पक्षप्रमुख आणि आदित्य ठाकरे हे ठाम आहेत. शिवाय आता दसरा मेळाव्यापासून (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या भूमिकेत बदल करणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिले आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री पद होते, त्यामुळे बोलण्यावर मर्यादा होत्या पण आता कुठलीही बंधने नाहीत. त्यामुळे ठाकरेंचा बाणा कसा असेल हे तर दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात पाहवयास मिळणार आहे.

मुख्यमंत्री पदाची भुरळ नव्हतीच

मला पद पाहिजे असते तर मी ते एवढ्या सहजासहजी सोडलेच नसते. पण तो आपला स्वभाव नाही. रहायचे असेल तर निष्ठा महत्वाचे आहे. पसाभर असण्यापेक्षा मूठभर हे निष्ठावंत असलेले कधीही चांगलेच. त्यामुळे जे गेले त्यांचा विचार न करता शिवसेनेची एक वेगळी रणनीती ठरणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांचे आभारही मानले.

सर्वांसाठी दरवाजे उघडे

निष्ठेने पक्षाचे काम केले तरच उद्या चांगला दिवस उजाडणार आहे. शिवाय अनेकांनी साथ सोडली म्हणून विचारावर आणि पक्षाच्या धोरणावर त्याचा परिणाम होणार नाही. अजूनही सर्वांसाठी दरवाजे हे खुले आहेत. ज्यांना रहायचे आहे ते राहतील आणि ज्यांना जायचे असेल त्यांच्यासाठी दरवाजे हे खुलाच आहे असेही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यापासून सेनेचे बदललेले स्वरुप पाहवयास मिळणार का हे देखील औत्सुक्याचे असणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.