केवळ घोषणांचा पाऊस व शेतकऱ्यांची फसवणूक; ठाकरे सरकारवर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

चंद्रपूर : महाराष्‍ट्रात 1.37 कोटी शेतकरी (farmer) आहेत. त्‍यातील 1.06 कोटी गरीब शेतकरी आहेत. 6 मार्च 2020 रोजी विधानसभेत सरकारने सांगितले होते. नियमित कर्ज भरणाऱ्यांच्‍या खात्‍यात आम्‍ही 50 हजार रूपये जमा करू, ही घोषणा पूर्ण झाली नाही. आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्‍यात आली. पुन्‍हा 8 मार्च 2021 रोजी तीच घोषणा केली. पुन्‍हा एकदा सरकार (Government) खोटे […]

केवळ घोषणांचा पाऊस व शेतकऱ्यांची फसवणूक; ठाकरे सरकारवर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात
सुधीर मुनगंटीवार Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 7:46 PM

चंद्रपूर : महाराष्‍ट्रात 1.37 कोटी शेतकरी (farmer) आहेत. त्‍यातील 1.06 कोटी गरीब शेतकरी आहेत. 6 मार्च 2020 रोजी विधानसभेत सरकारने सांगितले होते. नियमित कर्ज भरणाऱ्यांच्‍या खात्‍यात आम्‍ही 50 हजार रूपये जमा करू, ही घोषणा पूर्ण झाली नाही. आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्‍यात आली. पुन्‍हा 8 मार्च 2021 रोजी तीच घोषणा केली. पुन्‍हा एकदा सरकार (Government) खोटे बोलले. 11 मार्च 2022 रोजी पुन्‍हा घोषणा केली. अजुनपर्यंत शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात 50 पैसे सुध्‍दा जमा झाले नाही. हा जनआक्रोश (Mass outrage) त्‍या शेतकऱ्यांसाठी आहे. पुढील महिन्‍याभरात जर सरकारने 50 हजार रूपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात टाकले नाही तर हा जनआक्रोश अधिक तिव्र होईल, असा ईशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. ते येथील भासरकार रतीय जनता पार्टीतर्फे आयोजित जनआक्रोश आंदोलनात बोलत होते.

अधिकाऱ्यांविरूध्‍द रोष नाही

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, आज चंद्रपूर जिल्‍हयातील 15 तालुक्‍यातील कार्यकर्ते कडक उन्‍हात एकत्र येवून सरकारला प्रश्‍न विचारायला व उत्‍तर मागायला आले आहे. चंद्रपूर जिल्‍ह्यात कोळसा खाणी, औष्‍णीक विज निर्मीती केंद्र आहे. आम्‍ही प्रदूषण सहन करतो आणि हे सरकार आमच्‍या जिल्‍ह्यात लोडशेडींग करते. हे अजिबात चालणार नाही. शेतकऱ्यांना पाणी दिले नाही तर पीक नष्‍ट होईल. आजही भारनियमन सुरू आहे हे अधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले आहे. माझा अधिकाऱ्यांविरूध्‍द रोष नाही, सरकारविरूध्‍द हा एल्‍गार आहे.

विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्‍थापना नाही

तसेच रोजगार हमी योजनेच्‍या मजुरांची मजूरी देण्‍यात आलेली नाही. राज्‍यात सर्वात जास्‍त विजेचे बिल भरणाऱ्या पांच जिल्‍ह्यांमध्‍ये चंद्रपूर जिल्‍हा आहे. आपण 93 टक्‍के विज बिल भरणा करतो. विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्‍थापना करण्‍यात आलेली नाही. धडक सिंचन विहीरींचे पैसे देण्‍यात आलेले नाही. प्राकुलामध्‍ये रेशनकार्डावर धान्‍य दिले जात नाही. पेट्रोल, डिझेलवरचा टॅक्‍स महाराष्‍ट्र शासनाने कमी केलेला नाही. 22 राज्‍यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहे. महाराष्‍ट्र सरकार जाणीवपूर्वक यासंदर्भात दिरंगाई करीत आहे.

आंदोलन अधिक तीव्र करू

धानाचा बोनस शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अंत्‍योदय व बीपीएल कार्डधारकांना त्‍वरीत धान्‍य उपलब्‍ध करण्‍याची आवश्‍यकता आहे. शेतकऱ्यांच्‍या कृषीपंपांना त्‍वरीत विजेचे कनेक्‍शन देण्‍याची आवश्‍यकता आहे. वन्‍यप्राण्‍यांमुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्‍याची आवश्‍यकता आहे. तसेच मानव व वन्‍यजीव संघर्ष रोखण्‍यासाठी उपाययोजजना करण्‍याची गरज आहे. चंद्रपूर महानगरात नझूल निवासी घर धारकांना मालकी पट्टे देण्‍यात आलेले नाही. त्‍याचप्रमाणे आदिवासी व गैरआदिवासी बांधवांना वनजमिनीवरील अतिक्रमणाचे स्‍थायी पट्टे त्‍वरीत देण्‍याची आवश्‍यकता आहे. यासर्व मागण्‍यांसाठी हा जनआक्रोश आहे. या जनआक्रोश आंदोलनाची तातडीने शासनाने दखल न घेतल्‍यास हे आंदोलन अधिक तीव्र करू असा ईशारा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

सरकारला सत्‍तेचा माज

यावेळी बोलताना माजी आमदार अतुल देशकर म्‍हणाले, सर्वसामान्‍य जनतेच्‍या तसेच शेतकऱ्यांच्‍या व्‍यथावेदनांशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही. प्रामुख्‍याने धान उत्‍पादक शेतकऱ्यांची उपेक्षा हे सरकार करीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. या सरकारला सत्‍तेचा माज आला आहे. या सरकारला वठणीवर आणण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन अतुल देशकर यांनी केले.

हे भ्रष्‍ट व वसुलीबाज सरकार

आंदोलनाचा समारोप भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या भाषणातून झाला. विधानसभेत खोटया व फसव्‍या घोषणा करून या सरकारने सातत्‍याने जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सर्वत्र भ्रष्‍टाचार बोकाळला आहे. हे भ्रष्‍ट व वसुलीबाज सरकार आहे. महाराष्‍ट्राला महाविनाशाकडे नेणाऱ्या या सरकारला त्‍यांची जागा दाखवा असे आवाहन देवराव भोंगळे यांनी केले.

इतर बातम्या :

धावत्या ट्रेनखाली पडलेल्या महिलेचे चमत्कारिकरित्या वाचले प्राण; पहा Shocking व्हिडीओ

Gold smuggling | केसातून सोनं! सोने तस्करीसाठी तस्कराने कशी लढवली शक्कल?; व्हिडीओ व्हायरल

PHOTO | मुंबई लोकल ट्रेनमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा फोटो!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.