देशात राजेशाही असती तर ही वेळ आली नसती- उदयनराजे भाेसले
उदयनराजे भाेसले यांनी आज त्यांच्या आंदाेलनाबद्दल भूमिका मांडली. ते नेमके काय म्हणाले जाणून घ्या
सातारा, छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वारंवार हाेत असलेल्या अवमानकारक वक्तव्यावर उदयनराजे भाेसले (Udayan Raje Bhosle) यांनी भाषणाच्या (Speech) माध्यमातून भूमीका मांडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीदेखील संवाद साधला. अंतःकरणातून जे करणं याेग्य वाटत आहे ते मी करताेय, यामुळे काेणाला काही अडचण हाेत असेल तर ताे त्यांचा भाग आहे असं उदयनराजे भाेसले म्हणाले. मागल्या जन्मी काही पुण्य केले असेल म्हणून या जन्मी ईतक्या माेठ्या घरात जन्म भेटला असावा असेही ते म्हणाले.
राजकारण नकाे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्यावर राजकारण नकाे तसेच या मुद्यापूढे माझ्यासाठी राजकारण महत्वाचे नाही असे उदयनराजे भाेसले म्हणाले. अनेक मुस्लिम बहुल देशांमध्ये आजही हुकूमशही आहे. राज्याच्या कारभारात लाेकांचा सहभाग असावा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी रूजविला. आज राजेशही असती तर ही वेळ आली नसती असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.
महाराजांबद्दलची आस्था कृतीतून दिसावी
छत्रपत शिवाजी महारांबद्दल आदर आणि आस्था असल्याचे प्रत्येकच सांगतात, अनेक जण त्याचा भाषणातही उल्लेख करतात, मात्र त्यांची आस्था कृतीतून दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांना महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे त्यांचे तूकडे झाले. आज तिच परिस्थीती देशात आणि राज्यात निर्माण हाेत असल्याचे उदयनराजे भाेसले म्हणाले.
ठराविक मुद्यांबाबत तडजाेड हाेणे अशक्य
प्रत्येक मुद्यावर राजकारण करणे याेग्य नसून ठराविक मुद्यांच्याबाबतीत तडजाेड करणे शक्य नसल्याचे मत उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडिच्या आंदाेलनाला पाठींबा देणार का? याप्रश्नावर ते म्हणाले की, माझ्या मार्गाने काम करताय.