Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Pawaskar : दंगलीच घडवायच्या तर आधी आदित्य ठाकरेंच्या हातामध्ये दगड द्या, इतरांच्या खांद्यावर बंदूक कशाला? पावसकरांचे ठाकरेंना थेट अव्हान

कारवाईच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांचा पोलिसांवर दबाव नाही. तर सध्या राज्यातील स्थिती पक्ष प्रमुखांनाच पाहवली नाही. म्हणूनच दादर पोलिस स्टेशनला गराडा असताना मातोश्रीवरुनच कार्यकर्त्यांना फोन गेले आणि राडा झाला. तुमचे होते राजकारण पण यामध्ये गोरगरीब घरातील शिवसैनिक अडकतो. गेल्या सतरा वर्षापासून मी याचीच शिक्षा भोगत असल्याचेही पावसकर म्हणाले आहेत.

Kiran Pawaskar : दंगलीच घडवायच्या तर आधी आदित्य ठाकरेंच्या हातामध्ये दगड द्या, इतरांच्या खांद्यावर बंदूक कशाला? पावसकरांचे ठाकरेंना थेट अव्हान
किरण पावसकर आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 7:57 PM

मुंबई : प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या राड्यानंतर आता (Political differences) राजकीय मतभेद अधिक टोकाला गेले आहेत. यातच शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी थेट (Police Station) पोलिस स्टेशनसमोरच गोळीबार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खा. अरविंद सावंत यांनी केली होती. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आतापर्यंत शिवसैनिकांच्या जीवावर ठाकरेंनी आपला हेतू साधला होता. आता दंगलीच घडवायच्या असतील तर आधी (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या हाताममध्ये दगड द्या असे थेट अव्हानच किरण पावसकर यांनी दिले आहे. शिवाय सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची होत असलेली प्रसिद्धी ही पाहवत नसल्याने ही कुरघोडी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

रस्त्यावर उतरवा अन् मग होऊन जाऊद्या

रस्त्यावर उतरायचे शिवसैनिकांनी आणि यांच्या लेकरांनी एकतर घरात किंवा हॉटेलमध्ये पार्टी करीत बसायचे. आतापर्यंत हेच सुरु होते. खोटे आरोप करुन दंगलीच घडवून आणायच्या असतील तर आधी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या दगड द्या अन् रस्त्यावर उतरवा असा सल्लाच पावसकर यांनी पक्ष प्रमुखांना दिला आहे. गोरगरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल होऊ द्यायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हीच त्यांची परंपरा असल्याचा घणाघात पावसकर यांनी केला आहे.

किरण पावसकरांचे गंभीर आरोप

महाविकास आघाडी सरकारच्या काळात यांनी कंगना रनौत, राणा दाम्पत्य आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हीच परंपरा ठाकरे परिवाराची राहिलेली आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा बंद करा कारण नारायण राणे यांनी ज्यावेळेस पक्ष सोडला आणि सामना कार्यालयासमोर दंगल झाली त्या दंगलीचा साक्षीदार मी आहे. सतरा वर्षे झाली ती, आजही ती केस चालू आहे. आम्ही तारखा करतोय. असा आरोप त्यांनी केला आहे.

म्हणूनच पोलिस स्टेशनसमोर राडा

कारवाईच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांचा पोलिसांवर दबाव नाही. तर सध्या राज्यातील स्थिती पक्ष प्रमुखांनाच पाहवली नाही. म्हणूनच दादर पोलिस स्टेशनला गराडा असताना मातोश्रीवरुनच कार्यकर्त्यांना फोन गेले आणि राडा झाला. तुमचे होते राजकारण पण यामध्ये गोरगरीब घरातील शिवसैनिक अडकतो. गेल्या सतरा वर्षापासून मी याचीच शिक्षा भोगत असल्याचेही पावसकर म्हणाले आहेत.

खरे दु:ख हे वेगळेच

राज्यात यंदा सर्व सणसुद हे मोठ्या उत्साहात सुरु आहेत. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचीच राज्यात चर्चा सुरु आहे. गेल्या दोन वर्षात आपण काहीच करु शकलो नाहीतर यांची एवढी प्रसिद्धी हेच दु:ख पक्ष प्रमुख यांना झाले आहे. त्यामुळे असे प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप पावसकर यांनी केलाय.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.