…तरच विरोधी पक्षनेत्याच्या बोलण्याला महत्त्व असेल : एकनाथ खडसे

भाजपचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत (Advice of Eknath Khadse to Devendra Fadnavis).

...तरच विरोधी पक्षनेत्याच्या बोलण्याला महत्त्व असेल : एकनाथ खडसे
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 01, 2019 | 7:37 PM

जळगाव : भाजपचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत (Advice of Eknath Khadse to Devendra Fadnavis). यात सरकारवर केवळ प्रसिद्धीसाठी आरोप न करण्याच्या सल्ल्याचाही समावेश आहे. विधीमंडळातील अधिवेशनात अनेक नेत्यांनी एकनाथ खडसे यांची आठवण काढली. त्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव देखील जिंकला. 169 आमदारांनी महाविकासआघाडीला पाठिंबा दिला. आज (1 डिसेंबर) विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची, तर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. दरम्यान आज या निवड प्रसंगी अभिनंदनाचा ठराव करताना सर्व पक्षीय नेत्यांकडून माजी मंत्री आणि प्रदीर्घ काळ विरोधी पक्षनेते राहिलेल्या एकनाथ खडसेंची आठवण काढण्यात आली. याविषयी खडसे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकनाथ खडसे म्हणाले, “केवळ प्रसिद्धीसाठी सरकारवर आरोप होऊ नये. पुराव्यानिशी पूर्ण अभ्यास करून सरकारवर आरोप केले पाहिजेत. तरच विरोधी पक्षनेत्याच्या बोलण्याला अधिक महत्त्व राहिलं. याची काळजी त्यांनी नेहमीच घेतली पाहिजे. माझं विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केलं. तसेच माझ्या कामाची आठवण करून दिली. त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस देखील यापेक्षा उत्तम काम करतील अशी मला आशा आहे.”

लोकांना माझी आठवण माजी महसूलमंत्री म्हणून नाही, तर माजी विरोधी पक्षनेता म्हणून आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. तसेच माझा पक्षांतर करण्याचा काहीही विचार नसल्याचंही स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.