राहुल कनाल यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत, आयकर विभाग काय कारवाई करणार ?

शिवसेनेच्या अनेक नेत्यांना भाजपच्या केंद्रीय तपास यंत्रणा भीती दाखवत आहेत, त्यांना आपल्या पक्षात येण्यासाठी धमकावत आहेत असं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना अनेकदा सांगितलं आहे.

राहुल कनाल यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत, आयकर विभाग काय कारवाई करणार ?
फाईल फोटोImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:00 AM

मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigative Agencies) एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावर दिल्लीचं आक्रमण आहे, अशी प्रतिक्रिया काल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रसारमाध्यमांना दिली. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना दिल्लीतल्या राष्ट्रीय एजन्सीकडून टार्गेट केलं जात आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती सध्या धाडी टाकल्या जात असून त्याला आम्ही घाबरत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने भाजप विरूध्द शिवसेना असं वातावरण आता चांगलचं तापलं आहे. सध्या आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय राहूल कनाल (rahul kanal) यांच्या घरावर काल आयकर विभागाने छापेमारी केली. राहूल कनाल यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.तसेच शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाची छापेमारी ही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना आयकर विभागाने टार्गेट केलं असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलून दाखवलं आहे.

महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती

मंगळवारी सकाळी आयकर विभागाने आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय राहूल कनाल यांच्या घरी छापेमारीला सुरूवात केली. राहूल कनाल हे बांद्रा परिसरात राहतात. तिथं दिवसभर आयकर विभागाने त्यांची चौकशी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दिवसभर चौकशी करत असताना कनाल यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तिथल्या परिसरात अनेक शिवसैनिक सुध्दा दिसत होते. रात्री उशिरा राहूल कनाल यांची चौकशी संपल्यानंतर पोलिसांनी राहूल यांच्या घरातून काही फायली चौकशीसाठी घेतले असल्याची माहिती मिळत आहे. चौकशी संपल्यानंतर बांद्रा घराच्या अनेक शिवसैनिक जमा झाले होते. त्यावेळी राहूल कनाळ यांनी शिवसैनिकांची भेट घेतली.

कारवाई होणार का ? 

शिवसेनेच्या अनेक नेत्यांना भाजपच्या केंद्रीय तपास यंत्रणा भीती दाखवत आहेत, त्यांना आपल्या पक्षात येण्यासाठी धमकावत आहेत असं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना अनेकदा सांगितलं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या चौकश्या सुरू आहेत. नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्श नव्याने पुन्हा समोर आला आहे. शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांची देखीलआयकर विभागाने चौकशी केली. काल राहुल कनाल यांची चौकशी झाल्यानंतर त्याच्यावरती काय कारवाई करणार अशी राजकीय चर्चा होती.

PM Kisan Yojna : 25 मार्चला ठरणार’त्या’शेतकऱ्यांच्या योजनेचे भवितव्य, 31 मार्चला चित्र स्पष्ट

Health Vastu Tips | मासिक पाळी दरम्यान असह्य वेदना होतात? आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, वास्तु टिप्स फॉलो करा

Russia Ukraine War Live : पाकिस्तानच्या अस्मा शफीकने मानले मोदी सरकारचे आभार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.