कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण, आयोजकांवर गुन्हा, फार्म हाऊसही सील
खुलताबाद परिसरातील एका कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. इतकंच नाही तर जलील यांच्यावर या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पैशांची उधळणही झाली होती. या प्रकारानंतर आता कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
औरंगाबाद : कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात औरंगाबाद प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध करणारे AIMIMचे खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद प्रशासनाच्या कुठल्या निर्णयाला विरोध केला नाही तर थेट कोरोना नियमावलीलाच हरताळ फासल्याचं पाहायला मिळत आहे. खुलताबाद परिसरातील एका कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. इतकंच नाही तर जलील यांच्यावर या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पैशांची उधळणही झाली होती. या प्रकारानंतर आता कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच ते फार्म हाऊसही सील करण्यात आलं आहे. (Imtiaz Jalil’s video goes viral, crime against Qawwali organizer, farm house sealed)
कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करुन कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माध्यमांनी ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई केलीय. कोरोना निर्बंधातही कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्या उपस्थितीत फार्म हाऊस सील करण्यात आलंय. या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे व तपासाअंती कार्यक्रमात सहभागी झालेल्यांवरही गुन्हा दाखल केला जाणार आहे.
चंद्रकांत पाटलांचं पोलीस आयुक्तांना निवेदन
इम्तियाज जलील यांचा कव्वालीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आल्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलंय. खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय. इम्तियाज जलील यांनी कोरोना काळात अनेक वेळा नियम मोडले आहेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खैरे यांनी केलीय.
इम्तियाज जलील यांचा व्हिडीओ व्हायरल
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असं असताना खुलताबाद परिसरात कव्वालीच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कव्वालीच्या या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलीलही सहभागी झाले. त्याचबरोबर जलील जेव्हा व्यासपीठावर गेले तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नोटांची उधळणही करण्यात येत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इम्तियाज जलील यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या :
आमदार अंबादास दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबईतील एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा, इम्तियाज जलील यांचा आरोप, रोख कुणाकडे?
Imtiaz Jalil’s video goes viral, crime against Qawwali organizer, farm house sealed