औरंगाबादेत भाजप-शिवसेनेचा बाप निवडून येईल असं यांना स्वप्नातही वाटलं नसेल: इम्तियाज जलील
ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल (एमआयएम) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिवसेनेवर जहरी टीका (Imtiyaz Jaleel criticize BJP Shivsena) केली आहे.
पुणे: ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल (एमआयएम) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिवसेनेवर जहरी टीका (Imtiyaz Jaleel criticize BJP Shivsena) केली आहे. औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेनेचा बाप (Father of BJP Shivsena) निवडून येईल, असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल, असा जहरी टोला जलील (Victory of MIM in Aurangabad) यांनी लगावला. ते एमआयएमच्या पुण्यातील प्रचारसभेत बोलत होते.
एमआयएमने विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर एमआयएमने राज्यभरात आपल्या प्रचारसभांचं आयोजन केलं आहे. त्यापार्श्वभूमीवर आता एमआयएम आक्रमक झालेली दिसत आहे. पुण्यातील सभेत इम्तियाज जलील म्हणाले, “औरंगाबादमधून भाजप शिवसेनेचा बाप निवडून येईल, असं भाजप-शिवसेनेला स्वप्नातही वाटलं नव्हतं. औरंगाबादमध्ये मी एमआयएमकडून निवडणूक जिंकू शकतो, तर पुण्यातही हे होऊ शकतं.”
‘उद्धव ठाकरे एमआयएमच्या तिकिटावर लढले तर आश्चर्य वाटून देऊ नका’
एमआयएमतर्फे धोबी समाजाचा अध्यक्ष निवडणूक लढतो आहे. त्याचं नाव ठाकरे आहे, असंही यावेळी जलील यांनी नमूद केलं. तसेच उद्या उद्धव आणि आदित्य एमआयएमकडून लढू असं म्हणू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे एमआयएमच्या तिकिटावर लढले तर आश्चर्य वाटून देऊ नका, असंही ते म्हणाले.
बाजारात पैसे देऊन कुत्रं आणि मांजराची पिल्लं विकली जातात, वाघाची नाही, असं म्हणत जलील यांनी शिवसेनाला लक्ष्य केलं. मोदी, ठाकरे, पवार यांची भाषणं ऐकायला 200, 500 रुपये देऊन लोक आणावी लागतात, असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.
जलील यांनी काँग्रेससोबत सोनिया गांधींनाही अप्रत्यक्षपणे लक्ष केलं. ते म्हणाले, “काँग्रेसला इटलीची अम्मा चालते. मग हैद्राबादची शेरवानीच का चालत नाही?”
‘एमआयएम फक्त मुस्लिमांचा पक्ष नाही’
जलील म्हणाले, “एमआयएम फक्त मुस्लिमांचा पक्ष नाही. एमआयएमने सर्व समाजातील लोकांना विधानसभेत उमेदवारी दिली आहे. आम्ही बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे मांडले. तेव्हा लोकांना समजलं एमआयएम हा जातीयवादी पक्ष नाही.”