युद्ध झाल्यास राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार का? लसीवरुन केजरीवाल भडकले

जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपआपले रणगाडे खरेदी करायचे का? असा सवाल अरविंद केजरीवालांनी केंद्र सरकारला विचारला.

युद्ध झाल्यास राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार का? लसीवरुन केजरीवाल भडकले
अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 5:48 PM

नवी दिल्ली : कोरोना संकटादरम्यान दिल्लीत आजपासून ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन (Drive in vaccination Delhi) अभियान सुरु झालं आहे. त्यानुसार आता दिल्लीकरांना त्यांच्या कारमध्ये बसूनच कोरोना लस दिली जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांच्या हस्ते ड्राईव्ह इन लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. यावेळी पत्रकार परिषदेत केजरीवालांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.  जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपआपले रणगाडे खरेदी करायचे का? असा सवाल अरविंद केजरीवालांनी केंद्र सरकारला विचारला. (In case of a war, should Delhi come up with a nuclear bomb, UP come up with a tank ?’ asks CM Arvind Kejriwal during drive-in vaccination center launched )

केजरीवालांचा केंद्रावर घणाघात

केंद्र सरकार आजही कोरोना संकटात गंभीर नसल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. तुमचे तुम्ही लसीची सोय करा असं केंद्राने राज्यांना सांगितलंय. लसींबाबत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे, मात्र अजूनही कोणत्याही राज्याला एक लसही मिळवता आली नाही. लस बनवणाऱ्या कंपन्या केंद्राकडे बोट दाखवत आहे. सर्व टेंडर फेल होत आहेत. मग अशा परिस्थितीत राज्यांनी करायचं काय? केंद्र सरकार देशासाठी लस का खरेदी करत नाही? असा सवाल केजरीवालांनी विचारला.

टीम इंडिया बनून काम करणे गरजेचं

सध्याच्या परिस्थितीत टीम इंडिया बनून काम करणे गरजेचं आहे. जर युद्धासारखी परिस्थिती असेल तर त्यावेळी तुम्ही राज्यांना तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणाल का? जर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध छेडलं तर तुम्ही राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार का असा सवाल केजरीवालांनी विचारला.

ही वेळ भारताला एकत्र येऊन काम करण्याची आहे, टीम इंडिया म्हणून या संकटाला तोंड द्यायला हवं असं केजरीवाल म्हणाले. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री शिपायाप्रमाणे लढा देत आहेत, मात्र केंद्राचं काम आम्ही कसं करु, असंही केजरीवालांनी नमूद केलं.

कोरोनाविरुद्ध आपली लढाई सुरु आहे. या युद्धावेळी सर्व राज्यांनी आपआपलं बघावं असं म्हणून शकत नाही. पाकिस्तानने युद्ध केल्यास उत्तर प्रदेशने तुमचे रणगाडे खरेदी करा, दिल्लीने आपआपली हत्यारे खरेदी करा असं म्हणणार का, असा हल्लाबोल केजरीवालांनी केला.

संबंधित बातम्या  

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 50 हजार, कर्ता माणूस गेल्यास 2500 पेन्शन, ‘या’ राज्याची मोठी घोषणा

पहिल्यांदा लसीकरण नंतर बारावीच्या परीक्षा,’या’ राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सुनावलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.