मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन औवैसी यांच्या पक्षाच्या पराजयावर एआयएआयआएनतर्फे ओवैसी यांनी स्पष्टीकरण दिलंय. ओवैसी यांनी पराजयामुळं खचले नसल्याचं सांगितलं. पुढील निवडणुकीत मोठ्या जोमानं ते कामाला लागणार आहेत. ओवैसी म्हणाले, गुजरातमध्ये आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढविली. १३ जागांवर उमेदवार उभे केले. आम्हाला यश मिळालं नाही. परंतु, अजूनही आम्ही निराश झालो नाहीत. या निव़डणुकीत ज्या कमी होत्या त्या पुढील निवडणुकीत पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जानेवारी महिन्यात गुजरातला जाणार असून, पक्षाला मजबूत करणार असल्याचं ओवैसी म्हणाले. ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षानं गुजरात विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांकांची मतं घेतली. यामुळं काँग्रेसची मतं विभागल्या गेलीत.
गुजरातमध्ये २००२ च्या गोधरा दंग्यानंतर मुस्लीम मतं ही काँग्रेसला मिळत होती. या निवडणुकीत मुस्लीम मतं एआयएमआयएमकडं गेलीत. गुजरातमध्ये एक आणि पाच डिसेंबरला मतदान झालं. निवडणुकीचे निकाल आठ डिसेंबरला जाहीर झालेत. काँग्रेसच्या मते, भाजपनं हिंदू मतांना संघटित केलं.
काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये विजयासाठी हरिजन, आदिवासी आणि मुस्लीम मतं मिळविण्याचा प्रयत्न करत होती. त्यात आम आदमी पक्षानं निवडणुकीत उडी घेतली. यामुळं काँग्रेसच्या मतांनाच धक्का लागला. याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला. भाजपनं गुजरात निवडणुकीत एकही मुस्लीम उमेदवार उभा केला नव्हता.
काँग्रेसचा आतापर्यंतच्या निवडणुकीत हा सर्वात कमजोर प्रदर्शन समजण्यात येत आहे. कारण काँग्रेसची मतं ही आम आदमी पक्ष तसेच एआयएमआयएमकडं विभाजली गेलीत. याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला.