मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान?, शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं, नेसवली साडी!

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला.

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान?, शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं, नेसवली साडी!
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 8:08 PM

पंढरपूर : वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं केलेल्या आंदोलनानंतर आता पंढरपूरमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी वीज बिला विरोधातील आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.(BJP party worker was beaten by Shivsena workers in Pandharpur)

वाढीव वीज बिलाविरोधात शुक्रवारी भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं. अनेक शहरांमध्ये महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं आहे. पंढरपूरमध्येही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

शिवसेनेचा आरोप काय?

“सांगली, सातारा परिसरात अतिवृष्टी झाल्यावर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण आता मात्र त्यांनी फक्त 5 हजार रुपये दिले. सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करु असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्रीपदी बसले. बायकोचं लुगडं धरुन घरात बसतो. बाहेर पडत नाही. का तर कोरोना होईल म्हणून”, अशा शब्दात कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.

पंढरपूर शहर बंदचा इशारा

त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शनिवारी कटेकर यांना गाठलं आणि त्यांना काळं फासलं. तसंच त्यांना साडी नेसवण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना जाब विचारत शिविगाळही केली. दरम्यान, शिरीष कटेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर उद्या पंढरपूर शहर बंद करण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय.

संबंधित बातम्या :

महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकल्यांमुळं भाजप आमदारासह 25 जणांवर गुन्हा

भाजपनं रान उठवलं, ऊर्जा मंत्री म्हणतात, चुकलं तर माफ करा पण..!

BJP party worker was beaten by Shivsena workers in Pandharpur

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.