Uddhav Thackeray : काम थांबलं नाही पाहिजे, सरकारच्या अस्थिर काळातही चार दिवसांत जवळपास पावने तीनशे जीआर

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. मात्र अशा अस्थिर वातावरणातही मंत्र्यांकडून विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटा सुरू आहे. गेल्या चार दिवसांत जवळपास पावने तीनशे विकास कामांचे जीआर काढण्यात आले आहेत.

Uddhav Thackeray : काम थांबलं नाही पाहिजे, सरकारच्या अस्थिर काळातही चार दिवसांत जवळपास पावने तीनशे जीआर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 12:34 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत (Shiv Sena) बंडखोरी केली आहे. शिवसेनेतील तब्बल 40 पेक्षा अधिक आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे. शिवसेनेतून एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने आमदार फुटल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. मात्र अशाही स्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटाचा लावल्याचे पहायला मिळत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे 21 जूनपासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या विभागातंर्गत येणाऱ्या तब्बल 280 विकास कामांच्या जीआरला मंजुरी देण्यात आली आहे. 21 जून रोजी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या गटाने शिवसेनेतून बंडखोरी केली. त्या दिवसापासून ते आतापर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे.

गुलाबराव पाटलांकडून 84 जीआर

मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील याच काळात आपल्या खात्याशी संबंधित 84 विकास कामांना मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा जीआर जारी करण्यात आला आहे. या सर्वांमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री आघाडीवर असून, सर्वाधिक जीआर हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून काढण्यात आले आहेत. तर त्यापाठोपाठ शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांकडून जीआर काढण्यात आले आहेत. सरकार अस्थिर बनले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे बहुमत मिळणार की सरकार कोसळणार याबाबत सध्या तरी कोणतीही खात्री नसल्याने, मंत्री विकास कामांना प्राधान्य देत असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंकडून 38 आमदांरांच्या समर्थनाचे पत्र

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर बनले आहे. शिवसेनेकडून अद्यापही बंडखोर आमदारांच्या मनधरणीचे काम सुरूच आहे. मात्र शिंदे गट भाजपासोबत युती या एकाच मागणीसाठी आडून बसला आहे. आता या सर्व गदारोळामध्ये एकनाथ शिंदे यांनी 38 आमदारांच्या समर्थनाचे पत्र जारी केले आहे. या पत्रावर 38 आमदारांच्या सह्या आहेत. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या सर्व आमदारांना गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आज दोन वाजता एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.