अजित पवार आणि बहिणींवर आयकराच्या दिवसभर धाडी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या मते आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच', अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय.

अजित पवार आणि बहिणींवर आयकराच्या दिवसभर धाडी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 7:39 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केलीय. त्यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि तीन बहिणींचाही समावेश आहे. त्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या मते आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच’, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय. (Sharad Pawar’s criticism of BJP and Central Investigation Agency over IT Raids)

‘शेतकरी आपली भूमिका मांडण्यासाठी जात असताना सत्ताधारी पक्षातील घटकांची वाहनं त्यांच्या अंगावर जातात. त्यात काही शेतकरी चिरडून ठार होतात. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. सहाजिकच या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारनंही मंत्रिमंडळ बैठकीत निषेध व्यक्त केलाय. मीही याबाबत तीव्र भूमिका व्यक्त केलीय. लखीमपूरच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आलाय. त्याची प्रतिक्रिया म्हणून आज हे सुरु असल्याची शक्यता आहे’, अशा शब्दात पवारांनी आयकर विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिलीय.

हा अधिकाराचा अतिरेक, पवारांची संतप्त प्रतिक्रिया

मी अजित पवार यांचं विधान वाटलं. कर वसुली करण्यासाठी जर त्यांना काही शंका येत असेल तर त्या संबंधीची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे. या अधिकाराचा वापर कुणासंदर्भात करायचा, त्या संस्था किंवा त्यांच्याशी संबंधित बाबींवर केला तर योग्य आहे. पण या व्यवहाराशी दूरपर्यंत संबंध नसलेल्या मुलींवरही छापे टाकणं हा अधिकाराचा अतिरेक आहे, अशी घणाघाती टीकाही पवारांनी केलीय.

अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करायचा?

आता लोकांनीच विचार करायला हवा की या प्रकारे अधिकाराचा गैरवापर हा किती दिवस सहन करायचा? काही लोक वेडीवाकडी भाष्य करुन, आरोप करुन, काहीही बोलतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय एजन्सी त्याबद्दल कारवाई करण्यासाठी पुढे येतात. हे सर्वात आक्षेपार्ह असल्याचं सांगत पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरही निशाणा साधलाय.

पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावरही छापा

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला आहे.

इतर बातम्या :

अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्याबाबत संपूर्ण माहिती द्यावी, किरीट सोमय्यांचं आव्हान

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला? जयंत पाटलांचा खोचक सवाल

Sharad Pawar’s criticism of BJP and Central Investigation Agency over IT Raids

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.