तब्बल 24 तास उलटले, तरी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूचं; घराबाहेर शिवसैनिक आक्रमक
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची शुक्रवारी सकाळपासून छापेमारी सुरूच आहे, त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आयकार विभागाचे छापेमारीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मुंबई – काल सकाळी शिवसेना (shivsena) नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरू केली, ती अद्याप तशीचं सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाच्या छापेमारीला आता 24 तास उलटून गेले आहेत. तरी सुध्दा त्यांची चौकशी सुरू असल्याने आयकर विभागाच्या हाती नेमकं काय सापडलं असेल अशी अनेकांना शंका आहे. त्याचबरोबर आयकर विभागाकडून अद्याप कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सगळं प्रकरण गुलदस्त्यात असल्याचं समजतंय. माझगाव येथील यशवंत जाधव यांच्या अनेक शिवसैनिकांनी ठिय्या धरला असून तिथं अधिक पोलिस (mumbai police) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आतमध्ये नेमकं काय सुरू आहे याची जराशी कुणकुण देखील कुणाला नाही. यशवंत जाधव यांनी परदेशात पैसा लपवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. राज्यातील राजकारण सध्या अधिक तापल्याचं पाहायला मिळत आहे.
यशवंत जाधवांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त
आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मारून बसले आहेत. मध्यरात्रीच्या वेळीत यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढणार असल्याचं समजल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र झाले झाले होते. त्यामुळे माझगाव परिसरात पोलिस बंदोवस्त अधिक वाढवण्यात आला आहे. आयकर विभागाला चौकशी करीत असताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे. काल मुंबईच्या महापौर यांनी यशवंत जाधव यांच्या घराजवळ गेल्याचे पाहायला मिळाले. त्या म्हणाल्या की शिवसैनिक अधिक आक्रमक आहे, तसेच त्यांच्याकडून चुकूनही कोणतं कृत्य होऊ नये म्हणून मी या परिसरात आले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांची खुशाल चौकशी करावी. ते आयकर विभागाच्या छापेमारीला योग्य उत्तर देतील असं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.
शिवसैनिक आक्रमक
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची शुक्रवारी सकाळपासून छापेमारी सुरूच आहे, त्याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आयकार विभागाचे छापेमारीच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळं उपस्थित शिवसैनिकांना स्थानिक पोलिसांनी त्यांना समझावून शांत केले, रात्रभर शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून असल्याची माहिती मिळाली आहे. छापेमारीमध्ये यशवंत जाधव यांच्या घरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय काय लागलं ? हे अजून ही गुलदस्त्यातच आहे.