राज्यातील राजकीय वातावरण तापलं, देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रकरण विधानसभा आणि बाहेरही चांगलंच लावून धरलं आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
नागपूर : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझेला अटक, परमबीर सिंग यांची उचलबांगडी आणि गृहमंत्र्यांवर झालेले वसुलीचे गंभीर आरोप. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रकरण विधानसभा आणि बाहेरही चांगलंच लावून धरलं आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.(Increased security outside the residence of Devendra Fadnavis in Nagpur)
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर SRPFचे सशस्त्र जवान, शहर पोलीस दलाचे जवान आणि खासगी सुरक्षा रक्षक असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. त्यात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करण्यात आलाय. यासह अनेक गंभीर आरोप सिंग यांनी देशमुखांवर केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
अनिल देशमुख यांना शरद पवारांचा खंबीर पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे. कारण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड करताना, शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी परमबीर सिंगांच्या पत्राचा दाखला दिला.
परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.
मग हे अनिल देशमुख कोण?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. देशमुख क्वॉरंटाईन होते तर त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सुरक्षारक्षकांच्या लवाजम्यात पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Shri Sharad Pawar ji said, from 15th to 27th February HM Anil Deshmukh was in home quarantine. But actually along with security guards & media he was seen taking press conference! https://t.co/r09U8MZW2m
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
संबंधित बातम्या :
देशमुखांना वाचवण्यासाठी पवारांकडे पुरावे, त्या पुराव्याविरोधात फडणवीसांचा VIDEO पुरावा
VIDEO: राज्यातील घडामोडींचा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवा; सुधीर मुनगंटीवारांचे राज्यपालांना आवाहन
Increased security outside the residence of Devendra Fadnavis in Nagpur