सुशीलकुमारांच्या ‘दगडू’ तर जयसिद्धेश्वरांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला अपक्ष उमेदवाराचा आक्षेप

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज  छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘दगडू’ नावाला आणि भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला आक्षेप घेतला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असून छाननीमध्ये काँग्रेस, भाजप आणि बुहजन […]

सुशीलकुमारांच्या ‘दगडू’ तर जयसिद्धेश्वरांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला अपक्ष उमेदवाराचा आक्षेप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज  छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘दगडू’ नावाला आणि भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला आक्षेप घेतला आहे.

उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असून छाननीमध्ये काँग्रेस, भाजप आणि बुहजन वंचित आघाडीच्या तिन्हीही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, तर बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांचे खरे नाव दगडू शंभू शिंदे आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना  सुशीलकुमार संभाजीराव शिंदे असा उल्लेख केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. शिंदे यांचे वय 79 नमूद केल्याचाही आक्षेप घेण्यात आला होता. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीचा दाखला आणि नावाबाबतही आक्षेप घेण्यात आला होता. शिवाचार्यांचे मूळ नाव  नुरन्दय्या गुरुबसव्वा हिरेमठ असे आहे. त्यासाठी त्यांनी शाळेचा दाखलाही सादर केला होता. उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी घेतलेल्या  आक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी  यावर निर्णय देत आक्षेप घेतलेले दोन्हीही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आहेत. सुशीलकुमार शिंदेंनी नावात बदल केलेले गॅझेट जोडले आहे. शिवाय वयाच्या अडचणीबाबत सध्याच्या क्षणी अडचण येत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे बेडा जंगम नसून हिंदू लिंगायत आहे, असा दावा करण्यात आला. मात्र, सिद्धेश्वर यांनी जातीचा पुरावा जोडल्यामुळे त्यांचाही अर्ज वैध ठरवण्यात आला. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.